‘ठाणे महानगरपालिका स्थायी समितीच्या बैठकीचे आयोजन करा ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 11:25 PM2020-07-19T23:25:53+5:302020-07-19T23:28:50+5:30
नियमाप्रमाणे ताबडतोब स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी हणमंत जगदाळे, नम्रता कोळी आणि विक्र ांत चव्हाण आदी पाच सदस्यांनी सभापती राम रेपाळे यांच्याकडे केली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक तात्काळ आयोजित करण्यासंदर्भात हणमंत जगदाळे, नम्रता कोळी, विक्र ांत चव्हाण, भरत चव्हाण आणि कृष्णा पाटील आदी पाच सदस्यांनी समितीचे सभापती राम रेपाळे यांच्याकडे पत्राद्वारे सभा आयोजित करण्याची मागणी केली आहे.
वास्तविक, नियमाप्रमाणे पाच स्थायी समिती सदस्यांचे पत्र दिल्यानंतर स्थायी समितीची बैठक आयोजित करणे क्र मप्राप्त होते. परंतू तशी बैठक लावण्यात आलेली नाही. त्यामुळे २० मे २०२० रोजीच्या स्थायी समिती बैठकीमध्ये केलेल्या चर्चेप्रमाणे दर आठवडयाला बैैैठक आयोजित करण्याची चर्चा करून निर्णय घेण्यात आला. तरीही स्थायी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले नाही. सध्याच्या कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असताना प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधी आपल्या विभागात सातत्याने कार्यरत आहेत. परंतू, हे काम करीत असताना बऱ्याच ठिकाणी अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होत आहेत. त्याचा त्रास सामान्य नागरिकांनाही सहन करावा लागत आहे.
इतर शहरांमध्ये अशा प्रकारच्या बैठकींचे आयोजन करून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्र काम करीत असल्याचे पहायला मिळत आहे. परंतू, ठाणे शहरात तसे दिसत नाही. हीच बाब लक्षात घेऊन नियमाप्रमाणे ताबडतोब स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी या पाच सदस्यांनी केली आहे.