ठाणे आणि रायगड संघटनेतर्फे पक्षी निरीक्षण स्पर्धेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 08:30 PM2018-02-02T20:30:47+5:302018-02-02T20:30:47+5:30
लहानापणापासून मोठ्यांपर्यत सगळ््यांच्या आवडीचा विषय म्हणजे पक्षी होय. कधी या पक्ष्यांचे मनमोहक रंग तर कधी श्रवणीय आवाज हे सगळ््यांच्याच मनाला भुरळ घालतात. अश्या ह्या निसर्गाच्या मनोहर अविष्कारांबद्दल नेहमीच आपल्याला कुतूहूल असते.
डोंबिवली- लहानापणापासून मोठ्यांपर्यत सगळ््यांच्या आवडीचा विषय म्हणजे पक्षी होय. कधी या पक्ष्यांचे मनमोहक रंग तर कधी श्रवणीय आवाज हे सगळ््यांच्याच मनाला भुरळ घालतात. अश्या ह्या निसर्गाच्या मनोहर अविष्कारांबद्दल नेहमीच आपल्याला कुतूहूल असते. त्यांच्यासोबत वेळ घालवायची संधी ठाणे आणि रायगड संघटनेतर्फे ११ फेबु्रवारी रोजी सकाळी ६ ते दुपारी ३ या वेळेत पक्षी निरीक्षण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही एक सांघिक स्पर्धा आहे. प्रत्येक संघात कमीत कमी तीन तर जास्तीत जास्त ५ स्पर्धक असणे आवश्यक आहे. स्पर्धकांनी आपल्या संघाला एका पक्ष्याचे नाव द्यायचे आहे. नाव स्पर्धकांनी निवडताना तो पक्षी मुंबई संघातील असावा. प्रत्येक संघाला एक नोंदवही देण्यात येणार आहे. स्पर्धकांनी सायंकाळी ४ वाजता ती नोंदवही आयोजकांकडे दयायची आहे. स्पर्धेसाठी इयत्ता पाचवी ते दहावी गट, कनिष्ठ महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालय गट, खुला वयोगट असे तीन गट करण्यात आले आहेत. पक्षी निरीक्षणासाठी कोपर खाडी, भोपर टेकडी, हाजी मलंग रोड, पडले गाव, ठाकुर्ली इत्यादी ठिकाणे देण्यात आली आहे. स्पर्धेच्या दिवशी प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी संघाच्या मदतीसाठी पक्षी अभ्यासक हजर असतील. स्पर्धेसाठी १० फेबु्रवारी ला मार्गदर्शन वर्ग घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य असून ८ फेबु्रवारी पर्यंत प्रवेशिका स्वीकारल्या जाणार आहेत.
ठाणे आणि रायगड ही पक्षी संघटना २०११ साली स्थापन झाली. नवनवीन पक्षीमित्रांना प्रोत्साहन देणे आणि पक्षी संवर्धन आणि संरक्षणासाठी कार्य करणे हा उद्देश आहे. पक्ष्यांबाबत जास्तीत जास्त माहिती जनमाणसात अतिशय सध्या आणि सोप्या भाषेत पोहचविणे हे संस्थेचे ध्येय आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात चिमणी, कावळा, शिंपी, तांबट, गव्हाणी घुबड, घार, नाचरा, दयाळ, कबुतर, होला इत्यादी पक्षी आढळतात. या परिसरात २५० हून जास्त प्रकारचे पक्षी आढळतात. यामध्ये अनेक स्थालांतरित पक्षी व स्थानिक पक्ष्यांचा समावेश आहे. या जैवविविधतेचे खरे कारण म्हणजे विविध प्रकारचा अधिवास. ह्या वेगवेगळ््या अधिवासामध्ये नदी, खाडी, बंदरे, खुरटी वने, तलाव, गवताळ प्रदेश, खडकाळ प्रदेश, दाट वनराई, डोंगर इत्यादींचा समावेश आहे.दरवर्षी ५ ते ६ हजार बदके आणि किनाºयावरचे पक्षी स्थालांतरित होऊन कल्याण-डोंबिवलीच्या खाडी किनाºयावर हिवाळा व्यतीत करतात. अशा या अधिवासांना वाढत्या शहरीकरणाने धोका निर्माण झाला आहे. वृक्षतोड आणि रसायनांमुळे होणाºया प्रदूषणात वाढ झाली आहे. काही पक्षीनिरीक्षक व छायाचित्रकार पक्ष्यांना त्रास देतात. त्यामुळे पक्षी विचलित होतात. संस्थेतर्फे जनजागृतीपर हा कार्यक्रम राबविण्याचे ठरविले आहे. म्हणून केवळ स्पर्धेत सहभागी न होता निसर्गाचा मनमुराद आनंद लुटा असे आवाहन संस्थेने केले आहे.