लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा कहर झाला. रुग्णालयातील बेड कमी पडत असल्याने गंभीर समस्या निर्माण झाली. या समस्येवर मात करुन कोरोनाला हद्दपार करण्यासाठी जिल्ह्यातील २९ हजार ९२७ बाधितांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता घरात राहून डॉक्टरांच्या निगराणीत उपचार सुरु केले आहेत. यात ठाणे महानगरपालिकेतील सर्वाधिक नऊ हजार ६९४ बाधितांचा समावेश आहे. त्यांच्या या सामंजस्याने गंभीर रुग्णांना रुग्णालयात बेड उपलब्ध होऊन ते बरे झाले. या गंभीर परिस्थितीतही जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.७१ टक्के असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी समजदारी घेऊन, कोरोनावर मात करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने २९ हजार ९२७ बाधितांना घरातच ठेवून उपचार करून घेतले. यामुळे रुग्णालयांमधील बेडच्या समस्येवर मात करणे शक्य झाले आहे. याशिवाय महामारीच्या अफवांना बळी न पडता जिल्ह्यातील तब्बल ३९ लाख २१ हजार ९५७ जणांनी घरात राहून विलगीकरणाचा १४ दिवसांचा काळ यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. याशिवाय पाच लाख ४५ हजार ३८८ जणांनी स्वत:हून घरातच क्वारंटाईन होत कोरोनावर मात केली. कोणत्याही अफवांचा जास्त विचार न करता उद्भवलेली समस्या सोडवण्यासाठी या बाधितांनी डॉक्टरांच्या निगराणीत घरात राहून कोरोनामुक्तीचा संदेश दिला.
रुग्णालयांमध्ये बेड नसल्याचे लक्षात येताच त्याचा बागुलबुवा न करता या २९ हजार ९२७ जणांनी घरातच उपचार सुरु करुन कोरोनाला हद्दपार केले. यात ठाणेे महानगरचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक आहे. तब्बल नऊ हजार ६९४ ठाणेकरांनी घरातच उपचार करीत कोरोनावर मात करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. याखालोखाल कल्याण डोंबिवलीतील आठ हजार ३९८ आणि तृतीय क्रमांकावरील नवी मुंबईत चार हजार ८०५ नवी मुंबईकरांनी घरीच उपचार घेतला.
_-----
पुरक जोड आहे