जिल्हा परिषदेच्या प्रेमामुळे भारावलो - सोनवणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 10:22 PM2020-09-18T22:22:52+5:302020-09-18T22:24:07+5:30
ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांची राज्याच्या आदिवासी विकास आयुक्तपदी पदोन्नती झाली आहे.
ठाणे : गेली दीड वर्ष ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी काम करताना ग्रामीण भागातील नागरिकांना विविध पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषदेने दिलेल्या प्रेमामुळे आज मी भारावलो आहे असे भावोद्गार ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी निरोप समारंभा प्रसंगी काढले. त्यांची राज्याच्या आदिवासी विकास आयुक्तपदी पदोन्नती झाली आहे.
माझी नाळ ही ग्रामीण, आदिवासी जनतेशी जोडली गेलेली आहे. सामान्य नागरिकांना न्याय देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. त्यामुळे आयुक्तपदी काम करताना देखील आदिवासी बांधवासाठी जे जे करता येईल, त्यासाठी मी प्रयत्नशील राहील असे ही त्यांनी सांगितले. ठाणे ग्रामीण भाग हा खूप मोठा भाग आहे. मात्र जिल्ह्यात काम करताना माझ्या सहकारी अधिकारी वर्गाने मोलाची साथ दिली. त्यामुळेच विविध विकास कामांमध्ये ठाणे ग्रामीण राज्यात अग्रेसर राहू शकला. माझ्या सहकार्याचा मला सार्थ अभियान असल्याचे ते म्हणाले.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, चंद्रकांत पवार, छायादेवी शिसोदे आदींसह कार्यकारी अभियंता नितीन पालवे, एच. एल. भस्मे, शिक्षणाधिकारी शेषराव बडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेंघे, आदी उपस्थित होते.