कसाऱ्यात दरड कोसळली... महामार्ग, रेल्वे विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:24 AM2021-07-23T04:24:48+5:302021-07-23T04:24:48+5:30

कसारा : बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे कसाराच्या रेल्वे व महामार्ग घाटात दरडी कोसळल्याने मुंबई-नाशिक रेल्वे मार्गासह महामार्गांवरील वाहतूकही ...

Pain collapses in Kasara ... Highways, trains disrupted | कसाऱ्यात दरड कोसळली... महामार्ग, रेल्वे विस्कळीत

कसाऱ्यात दरड कोसळली... महामार्ग, रेल्वे विस्कळीत

Next

कसारा : बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे कसाराच्या रेल्वे व महामार्ग घाटात दरडी कोसळल्याने मुंबई-नाशिक रेल्वे मार्गासह महामार्गांवरील वाहतूकही विस्कळीत झाली होती.

बुधवारी रात्री ७.३०च्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्गांवरील कसारा घाटात चार ठिकाणी दरडी पडण्याच्या घटना घडल्या. परिणामी मुंबई-नाशिक लेन बंद करण्यात आली होती. नाशिककडे जाणारी वाहतूक नाशिक-मुंबई लेनवरून सुरू करण्यात आली. दरड कोसळल्याचे समजताच महामार्ग पोलीस, कसारा पोलीस, आपत्ती व्यवस्थापन टीमने घटनस्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. दोन तासांनंतरदेखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व टोल कंपनीकडून मदत उपलब्ध होत नव्हती. अखेर आपत्ती टीम व पोलिसांनी समृद्धी महामार्ग व्यवस्थापनाची मदत घेत त्यांच्याकडील मशिनरीच्या साहाय्याने दरडी हटविल्या. तब्ब्ल तीन तासांनंतर घाटातील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

दरम्यान, कसारा-इगतपुरी रेल्वे स्थानक दरम्यान कसारा रेल्वे घाटात २ ठिकाणी रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात दरड व मातीचा मलबा रेल्वे ट्रॅकवर आल्याने व लूप लाइनच्या रेल्वे ट्रॅकखालील माती भराव वाहून गेल्याने नाशिककडे जाणारी वाहतूक रात्री ८ पासून बंद ठेवण्यात आली होती. घटनास्थळी रेल्वेचे कर्मचारी, अधिकारी यांनी मदत कार्य सुरु केले. परिणामी यामुळे कसारा रेल्वे स्थानकात मुंबईहून नाशिकसह लांब पल्ल्यांच्या गाड्या थांबवण्यात आल्या होत्या.

रात्री ९.२०च्या सुमारास मुसळधार पावसामुळे कसारा-कल्याण रेल्वे मार्गावरील उंबरमाळी रेल्वे स्थानकात पाणी भरले होते. यामुळे कल्याणकडे जाणारी रेल्वे वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली होती. उंबरमाळी रेल्वेस्थानकातील पाणी काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन टीमने सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी मदत केली. दरम्यान, रात्री ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत कुठलीही रेल्वे वाहतूक सुरू झाली नव्हती.

Web Title: Pain collapses in Kasara ... Highways, trains disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.