मुंबई - लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अती सूक्ष्म कागदी पेपरच्या साहाय्याने हुबेहुब पेंटींग काढण्याची नोंद मुंबईच्या कांदिवलीतील टायनी पेपर आर्टिस्ट महालक्ष्मी वानखेडकर यांच्या नावावर आहे. महालक्ष्मी यांनी आत्तापर्यंत काढलेले सुमारे 15 पेंटींग दिल्लीच्या प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे. या पेंटिंग्समध्ये टायनी पेपरपासून तयार केलेले दुर्मिळ पक्षी, लेण्यांमधील मुर्त्यामध्ये रात्री चमकणारे दागिने, विविध प्रकारची नाणी यांचा समावेश असल्याचे महालक्ष्मी वानखेडकर यांनी सांगितले.
नवी दिल्ली येथील नीती बिश्त या तरुण आर्टिस्टने देशातील प्रसिद्ध व उदयोन्मुख आर्टिस्टसाठी हे प्रदर्शन भरवले आहे. चित्रकलेच्या माध्यमातून आपल्या देशाची संस्कृती व कला दिल्लीकरांसमोर आणण्यासाठी या आर्टिस्ट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आर्टिझन आर्ट गॅलरी, 1-2 प्यारेलाल भवन, बहादूर शाह जफर मार्ग, नवी दिल्ली-110002 येथे या प्रदर्शनाचे उदघाटन 18 रोजी सायंकाळी 5 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून येत्या 20 तारखेपर्यंत हे प्रदर्शन दिल्लीकरांसाठी खुले राहणार आहे. दरम्यान, या प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या पेंटींगच्या विक्रीतून मिळणारा पैसा हा कॅन्सर फाउंडेशनला देण्यात येणार असल्याची माहिती नीती बिश्त यांनी दिली.