समता संस्थेकडून एकलव्यांना मिळाली पुढील वाटचालीसाठी पंचसुत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 04:32 PM2018-07-23T16:32:27+5:302018-07-23T16:34:33+5:30

"दहावी नंतर पुढे काय?" या विषयावर आयोजित एकलव्य पाठपुरावा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

Panchasutir for the next step taken by the Samata Organization | समता संस्थेकडून एकलव्यांना मिळाली पुढील वाटचालीसाठी पंचसुत्री

समता संस्थेकडून एकलव्यांना मिळाली पुढील वाटचालीसाठी पंचसुत्री

Next
ठळक मुद्देसमता संस्थेकडून एकलव्यांना मिळाली पंचसुत्रीसंस्थेच्या वतीने "दहावी नंतर पुढे काय?" या विषयावर कार्यक्रमबॅन्क ऑफ बडोदा तर्फे एकलव्यांना पुस्तक वाटप

ठाणे : "घरच्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना देत एकलव्य विद्यार्थ्यांनी दहावीपर्यंत जी धमक दाखवली ती पुढील वाटचालीसाठी समृद्ध करण्या करता ध्येय निश्चिती व मोठी स्वप्ने पहाण्याची तयारी, ती अंमलात आणण्यासाठी आज असलेल्या आर्थिक मर्यादा ओलांडण्याचा वैधनिक प्रयत्न, निर्भयता किंवा धाडसी वृत्ती, इंग्रजी भाषेवर पुरेशी कमांड, आणि घर-परिसर-समाज- संघटना यांच्याप्रति प्रामाणिक बांधिलकी ही पंचसूत्री उपयुक्त ठरेल", असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व समता विचार प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डाॅ. संजय मंगला गोपाळ यांनी काल ठाण्यात केले. संस्थेच्या वतीने "दहावी नंतर पुढे काय?" या विषयावर आयोजित एकलव्य पाठपुरावा कार्यक्रमात ते बोलत होते

        एकलव्य सक्षमीकरण योजनेच्या संयोजक मनिषा जोशी अध्यक्षस्थानी होत्या. " ट्वेंटी - ट्वेंटीफाय अर्थात २०२५ साली मी कोठे असेन, याचा विचार एकलव्यांनी आत्तापासूनच सुरू करावा. स्वप्न पाहिल्या शिवाय ती एकदम व अचानक अंमलात येणे ही दुर्मिळ बाब आहे. आपले स्वप्न खर्चिक असेल तर काॅलेजमधे शिकतांनाच अर्धवेळ नोकरी, काटकसर, वाईट सवयींपासून दूर रहाणे व वेळ प्रसंगी उपलब्ध आर्थिक मदत वा कर्ज मिळविणे आदी वैधनिक पद्धतीने आपण त्यावर मात करू शकतो हा आत्मविश्वास बाळगा. त्यासाठी जिद्द व मेहनतीला सचोटी व धाडसी वृत्तीची जोड द्या. काॅलेजमधे चिटकून न जाता सर्वांमधे मिसळून अभ्यासा बरोबरच खेळ, कला आदीतही पारंगत व्हा! हे करताांना इंंग्रजीची भिती न बाळगता  सराव सुरू करा. एकमेकांशी इंग्रजीत बोलत, चुकत माकत पण व्यवस्थित मदत मिळवत इंग्रजीवर कमांड मिळवा. आणि हे करतांना आपल्या घरच्यांनी आपल्यासाठी खाल्लेल्या खस्ता लक्षात ठेवून, नातेवाईक, शेजारी पाजारी यांनी दिलेली मदत ध्यानात ठेवून समता विचार प्रसारक संस्था तुमच्या प्रामाणिक मेहनतीत नेहमीच तुमच्या सोबत राहील, हा विश्वास बाळगा. दरमहा संस्थेच्या वतीने एकलव्यांसाठी व्यक्तिमत्व विकास, खेळ, कला आदी कार्यक्रम होणार आहेत. त्याचा लाभ घ्या". कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुर्वीची एकलव्य विद्यार्थीनी व संस्थेची कार्यकर्ता अनुजा लोहार हिने तर आभार प्रदर्शन शिक्षीका सीमा श्रीवास्तव यांनी केले.

बॅन्क ऑफ बडोदा तर्फे एकलव्यांना पुस्तक वाटप

 त्याआधी, बॅन्क ऑफ बडोदा च्या १११ व्या वर्धापन दिनानिमित बॅन्केच्या फ्लाॅवर व्हॅली शाखेतर्फे यंदा दहावीला असलेल्या आणि 'एकलव्य सक्षमीकरण योजने'त सामील प्रमुख्याने ठाणे महापालिका माध्यमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना दहावीच्या क्रमिक पुस्तकांचे संच मदत म्हणून देण्यात आले. यावेळी बॅन्केच्या विभागीय अधिकारी श्रीमती अय्यर, शाखाधिकारी श्रीमती जिसा मालियेकल, बॅन्केच्या निवृत्त अधिकारी व संस्थेच्या हितचिंतक श्रीमती कल्पना अभ्यंकर आणि शाखेतील कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सुनील दिवेकर, निराश दंत, ओंकार जंगम, दीपक वाडेकर प्रभृतींनी मेहनत घेतली.

 

Web Title: Panchasutir for the next step taken by the Samata Organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.