प्रशासनाकडूनच आचारसंहितेचा भंग? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:29 AM2017-07-31T00:29:11+5:302017-07-31T00:29:11+5:30

निवडणुकीच्या भरारी पथकासाठी वापरण्यात येणाºया गाडीवर युवा सेनेचे स्टीकर लावलेले असतानाही ते काढून न टाकता किंवा न झाकता प्रभाग समिती ५ अंतर्गत सर्रासपणे फिरवली जात आहे.

parasaasanaakadauunaca-acaarasanhaitaecaa-bhanga | प्रशासनाकडूनच आचारसंहितेचा भंग? 

प्रशासनाकडूनच आचारसंहितेचा भंग? 

Next

भाईंदर : निवडणुकीच्या भरारी पथकासाठी वापरण्यात येणाºया गाडीवर युवा सेनेचे स्टीकर लावलेले असतानाही ते काढून न टाकता किंवा न झाकता प्रभाग समिती ५ अंतर्गत सर्रासपणे फिरवली जात आहे. त्यामुळे प्रशासनाकडूनच आचारसंहितेचा भंग केला जात असल्याची चर्चा स्थानिकांसह राजकीय मंडळींमध्ये सुरू झाली आहे. 
मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीसाठी विविध पथकांच्या दैनंदिन कारभारासाठी पालिकेने भाडेतत्वावर अनेक वाहने घेतली आहेत. त्यातून भरारी पथकासह आपत्कालीन विभाग, निवडणूक अधिकारी ये-जा करत असतात. त्यातील प्रभाग समिती कार्यालयातील प्रभारी पथकाकडून परिसरातील संभाव्य गैरप्रकार रोखण्यासह त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पथकाला भाड्याने गाड्या देण्यात आल्या आहेत. एक गाडी स्थानिक युवा सेनेच्या पदाधिकाºयाची असून त्यावर त्याचा व पक्षाचा उल्लेख आहे. असे असतानाही ऐन पालिका निवडणुकीत भरारी पथकाकडून ही गाडी सर्रास फिरवली जात आहे. 

Web Title: parasaasanaakadauunaca-acaarasanhaitaecaa-bhanga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.