ठाणे : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा घोषात टाळमृदूगांच्या गजरात ठाणे शहरासह आयुक्तालय क्षेत्रात दीड दिवसांच्या चार सार्वजनिक तर ४० हजार ५९० घरगुती गणरायांना भाविकांनी भावपूर्ण निरोप दिला. पोलीस यंत्रणेबरोबरच महापालिकेचे सुरक्षारक्षक, अग्निशमन दलाचे जवान, एनसीसीचे विद्यार्थी, अनिरुद्ध अॅकॅडमी आॅफ डिझास्टर मॅनेजमेंट या संस्थेचे ५०० प्रशिक्षित स्वयंसेवकही विसर्जन घाटाच्या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. श्रींचे विसर्जन रात्री ११ पर्यंत झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
गणरायाच्या आगमनाला वरुणराजाने हजेरी लावली होती. तशी मंगळवारीही पावसाने हजेरी लावली. ठाणे शहर, भिवंडी, कल्याण, वागळे इस्टेट आणि उल्हासनगर येथे सायंकाळी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. ढोल ताशांचा गजर आणि अमाप उत्साह पण तितक्याच भावपूर्ण वातावरणात ठाण्यातील रायलादेवी, उपवन, मासुंदा तलाव, कोपरी येथील गणेशघाट आणि मुंब्रा येथील रेतीबंदर घाट याठिकाणी विसर्जन पार पडले. बाल गोपाळांबरोबरच वृद्धांचाही सहभाग वेधून घेणारा होता. विसर्जन मिरवणुकीला स्वयंसेवकांनी शिस्तीचे दर्शन घडविले. कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गृहरक्षक दल, राज्य राखीव दलासह चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. ठाणे महापालिकेने याही वर्षी कृत्रिम तलावाचे नियोजन केले होते. महापालिकेने रायलादेवी तलावाच्या बाजूला दोन तर उपवन येथे पालायदेवी मंदिराशेजारी, आंबेघोसाळे तलाव, नीळकंठ वुड्स टिकुजिनीवाडी, बाळकुम रेवाळे कृत्रिम तलाव तसेच खारेगाव येथेही कृत्रिम तलाव निर्माण केले. या उपक्रमाला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.पारसिक, कोलशेत येथे विसर्जन महाघाटच्श्रीगणेश मूर्तींचे विधिवत वाहत्या पाण्यात विसर्जन व्हावे, या दृष्टिकोनातून महापालिकेने पारसिक रेतीबंदर, कोलशेत रेतीबंदर आणि कोपरी येथे विसर्जन महाघाट तयार केले होते.च्तिथे छोट्या गणेश मूर्तींबरोबरच पाच फूट आणि त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या गणेशमूर्र्तींचे विसर्जन करण्याची व्यवस्था केली होती.च्याठिकाणी महापालिकेने आरतीस्थाने आणि निर्माल्य कलशाच्या व्यवस्थेबरोबरच भाविकांना श्रीगणेश विसर्जन सोहळा पाहता येण्यासाठी विशेष व्यवस्थाही केली होती.मूर्ती स्वीकृती केंद्रेज्या भाविकांना विसर्जन घाट किंवा कृत्रिम तलावांच्या ठिकाणी श्रींच्या मूर्तींचे विसर्जन करता येणे शक्य नाही, त्यांच्यासाठी महापालिका मासुंदा तलाव परिसर आणि मढवी हाउस, चिरंजीवी हॉस्पिटल, जेल तलाव परिसर, खिडकाळी, उपवन तलाव, खारीगाव, मॉडेला चेकनाका आदी ठिकाणी श्रीगणेशमूर्ती स्वीकार केंद्र उभारण्यात आली होती.