भिवंडीतील रुग्ण वाढ दुपटीचा कालावधी 65 दिवसांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 06:23 PM2020-08-01T18:23:11+5:302020-08-01T18:23:26+5:30

मात्र ग्रामीण भागात आरोग्य सेवा सक्षम नसल्याने शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोना परिस्थिती बिकट होत चालली आहे.

Patient growth in Bhiwandi doubled to 65 days | भिवंडीतील रुग्ण वाढ दुपटीचा कालावधी 65 दिवसांवर

भिवंडीतील रुग्ण वाढ दुपटीचा कालावधी 65 दिवसांवर

Next

नितीन पंडित
भिवंडी - भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यात आरोग्य यंत्रणेसह पालिका प्रशासनाला यश आल्याने सध्या शहरात समाधान व्यक्त केले जात आहे. सध्या भिवंडीतील रुग्ण वाढ दुपटीचा कालावधी 65 दिवसांवर आला आहे. मात्र ग्रामीण भागात आरोग्य सेवा सक्षम नसल्याने शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोना परिस्थिती बिकट होत चालली आहे.

मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्या नंतर केंद्र व राज्य सरकार ने विविध उपाययोजना करीत आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्या सोबत स्थलांतरीत मजुरांची भूक भागविण्या पासून त्यांच्या प्रवासाची व्यवस्था करण्या पर्यंत अनेक सोपस्कर अवलंबिले परंतु भिवंडी शहर व ग्रामीण भागात उपाय योजना करण्यातस एप्रिल महिन्यात प्रशासन अपयशी ठरल्याने जून महिन्यात परीसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ होत असतानाच मृत्यूचे प्रमाण ही वाढले होत परंतु जुलै मध्ये आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी पदभार स्वीकारल्या नंतर व नव्या आयुक्तांनी रावबिलेल्या उपाययोजनांचा परिणाम जुलै महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात दिसून आला . त्यामुळे आज शहरातील अनेक खासगी कोविड रुग्णालयात बेड रिकामे होत आहेत. त्याच बरोबर रुग्ण मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण ही कमी झाले असून शहरातील खाजगी कोविड रुग्णालयांकडून होणारी रुग्णांची पिळवणूक थांबविण्यात प्रशासनाने कंबर कसली असल्याने शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आली आहे.

तर ग्रामीण भागातील रुग्णांची सुरवाती पासून रुग्णालय दाखल होण्या पासून उपचार मिळविण्यासाठी येथील रुग्णांना झगडावे लागले परंतु आज ही जिल्हा प्रशासन आरोग्य सुविधा मिळवून देण्यात आज ही यशस्वी झाले नसल्याने ग्रामीण भागातील कोरोना परिस्थिती सुधारली नाही.  येत्या आठवड्यात गणेशपुरी येथील नित्यानंद रुग्णालयात 300 बेड चे कोविड सेंटर सुरू होणार असून कोनगाव येथे 200 तर काल्हेर येथे 100 बेड सह सवाद येथे 700 बेड चे कोव्हिडं केअर सेंटर उभारले जाणार आहेत. विशेष म्हणजे हिच कोविड सेंटर आधीपासूनच सुरु केली असती तर रुग्णांची कोरोना मुळे झालेली वाताहत थांबविता आली असती.

दरम्यान शहरातील रुग्ण वाढीचा वेग मंदावला असून रुग्ण दुपट्टीचा कालावधी 65 दिवसांवर पोहचला तर शहरातील मृत्यु दर 5. 44  % तर ग्रामीण भागात मृत्यु दर 3.12 % आहे . दरम्यान " जून महिन्यात झालेल्या मृत्यूंची आकडेवारी जुलै महिन्यात मिळाली असल्याने जुलै महिन्यात मृत्यूंच्या आकडेवारीत वाढ दिसत आहे. मात्र जुलै पासून कोरोना रुग्णसंख्या रोखण्यात व मृत्यू दर कमी करण्यात मनपासह आरोग्य यंत्रणेला नक्कीच यश आले आहे अशी प्रतिक्रिया मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन मोकाशी यांनी दिली आहे. 

Web Title: Patient growth in Bhiwandi doubled to 65 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.