आयोध्या नगरीत प्रेमप्रतिक इमारतींमध्ये पाइप गॅस पुरवठा सुविधा सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 05:20 PM2020-02-28T17:20:46+5:302020-02-28T17:21:18+5:30
सिलेंडरच्या जाचातून गृहिणींची होणार सुटका
डोंबिवली: महानगर गॅसच्या माध्यमातून घराघरात पाईप गॅसची सुविधा देण्याचा प्रकल्प २०१२ पासून सुरु झाला. तेव्हापासू शुभारंभ झालेल्या कामामध्ये अनेक तांत्रिक अडचणी आल्याने तो लांबला होता, परंतू आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या अडचणी हळुहळु सोडवल्या. त्यानूसार आधी जिमखाना परिसरात तर शुक्रवारपासून अयोध्या नगरितील प्रेमप्रतिक ईमारतीच्या रहिवाश्यांना त्याचा लाभ मिळायला सुरुवात झाली. आगामी काळात तेथे आणखी ३५० घरांमध्ये ती सुविधा मिळेल असा विश्वास महानगर गॅसचे अधिकारी, शिवसैनिकांनी व्यक्त केला.
संपूर्ण डोंबिवली शहरात हे काम जलदगतीने पुरे करण्याचा संकल्प शिंदे यांनी केला आहे. आयोध्या नगरीत घराघरात गॅस सुरू करण्याच्या कामाचा शुभारंभ शिवसेना कल्याण उपजिल्हा प्रमुख सदानंद थरवळ, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी केला. त्यामुळे लवकरच शहरातील गृहिणींचा सिलेंडरच्या जाचातून सुटका होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
गॅस वाहीनी भूमिगत टाकण्याचे काम महानगर गॅस कंपनी कडून चालू असून या गॅसच्या वाहीनी भूमिगत टाकण्यात महानगरला अनेक टप्प्यावर अडचणी येतात. या अडचणींतून सुटका व्हावी म्हणून खासदार शिंदे त्या सोडवत असतात. त्यासंदर्भात शुभारंभापासून या प्रकल्पाचा पाठपुरावा करणारे शिवसैनिक प्रफुल्ल देशमुख यांनी त्या कामाची माहिती उपस्थितांना दिली. त्यावेळी पक्षाचे उपशहरप्रमुख अभिजीत थरवळ, विवेक खामकर,विभागप्रमुख अमोल पाटील, शाखाप्रमुख संजय मांजरेकर, लक्ष्मीकांत अंबरकर आदिंसह शिवसैनिक, नागरिक उपस्थित होते.