लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सेवा रस्त्यांवर बेकायदेशीरपणे वाहने उभी करणाºया एक हजार ३३५ वाहनांविरुद्ध सहा लाख ६७ हजारांचा दंड आकारला आहे. तसेच कोरोनाचे नियम धुडकावून दोन पेक्षा जादा प्रवाशांची वाहतूक करणाºया तीन हजार ७२३ रिक्षा चालकांविरुद्ध १८ लाख ६१ हजार ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी गुरुवारी दिली.ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात मेट्रो लाईन चारच्या कामासाठी वाहतूकीच्या मुख्य रस्त्यांवर बॅरीकेटींग केली आहे. त्यामुळे वाहतूकीच्या रस्त्यांची रुंदी कमी होऊन सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते. अशा वेळी मुख्य रस्त्याच्या बाजूलाच असलेला सेवा रस्ता वाहतूकीसाठी खुला राहणे आवश्यक आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये वाहतूक व्यावसायिकांनी त्यांची बंद वाहने सेवा रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभी केली आहेत. त्यामुळेच सेवा रस्त्यावरील दुतर्फा वाहतूकीला अडथळे निर्माण होऊन नागरिकांना मन:स्ताप सोसावा लागतो. याबाबत वाहतूक नियंत्रण शाखेकडेही अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळेच सेवा रस्त्यावरील अनधिकृत पार्र्किं ग काढून सेवा रस्ते वाहतूकीस मोकळे करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत १ ते १८ नोव्हेंबर २०२० या कालावधीमध्ये सेवा रस्त्यावरील तब्बल एक हजार ३३५ अनधिकृत पार्र्किं ग करणाºया वाहन मालकांविरुद्ध ई चलनाद्वारे, जामर्स आणि टोर्इंग व्हॅनद्वारे वाहतूक नियंत्रण शाखेच्या विविध पथकांनी कारवाई केली. त्याद्वारे सहा लाख ६७ हजार ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.* सेवा रस्त्यांवर दुकाने तसेच इमारतीच्या बाजूला असलेल्या भागात वाहने उभी करण्यास मुभा आहे. मात्र, महामार्गालगतच्या भागात वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. सेवा रस्ता वाहतूकीला मोकळा ठेवण्याचे आवाहनही पाटील यांनी यावेळी केले.* रिक्षा चालकांकडूनही चालकांशेजारी तसेच मागेही दोन पेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राहण्यासाठी चालकासह तिघांनाच परवानगी आहे. त्यामुळे एका विशेष मोहीमेंतर्गत गेल्या काही दिवसांमध्ये तीन हजार ७२३ रिक्षा चालकांविरुद्ध ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या चार विभागातील १८ युनिटने दंडात्मक कारवाई केली. ही मोहीम यापुढेही सुरु राहणार असल्याचे उपायुक्त पाटील यांनी यावेळी सांगितले.