ठाणे - ठाणे महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरु असतांनाच सभागृहामधील पीओपीचा काहीसा भाग पडल्याची घटना घडली आहे. यामध्ये सुदैवाने महापौर आणि त्यांच्या समवेत आजूबाजूला बसलेला अधिकारी वर्गही बचावला आहे. परंतु या निमित्ताने सभागृहाच्या आयुर्मानावर मात्र प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. शनिवारी महासभा संपत आली असतांनाच, अचनाक महापौरांच्या वरील भागातील सभागृहाचा पीओपीचा काही भाग पडला. पालिकेने मात्र हा किंचीतसा भाग असल्याचे सांगितले आहे. सुदैवाने यातून महापौर आणि त्यांच्या आजूबाजूला बसलेले अधिकारी वर्ग यातून बचावले आहे. त्यानंतर महासभाच वेळे अभावी संपली. यापूर्वी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सभागृहाचे छत पडल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतांनाच शनिवारी ठाणे महापालिकेतही तशीच काहीशी घटना घडल्याने सभागृहाच्या दुरुस्तीबाबत आता शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. ठाणे महापालिकेचे संपूर्ण मुख्यालयाच हे २५ वर्षापेक्षा जास्त जूने असून त्याचे स्ट्रक्चरल आॅडीट करण्यात आले होते. त्यानंतर सध्या मुख्यालय इमारतीच्या दुरुस्तीचे काम मागील काही महिन्यांपासून सुरु झाले आहे. परंतु असे असतांनाच शनिवारी महासभेच्या सभागृहाचे पीओपी पडल्याने दुरुस्ती बाबतही शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. तसेच सभागृहाच्या दुरुस्तीचा मुद्दासुध्दा या निमित्ताने पुढे आला आहे.
महासभेच्या सभागृहाचा पीओपीचा काही भाग पडला, सुदैवाने महापौर बचावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 7:27 PM
ठाणे महापालिकेच्या महासभेच्या सभागृहाचा पीओपीचा काही भाग पडल्याची घटना शनिवारी सांयकाळी 5.53 च्या सुमारास घडली. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झालेली नाही.
ठळक मुद्देसध्या मुख्यालयाची सुरु आहे दुरुस्तीमुख्यालय २५ वर्षे जुनी