- अरविंद म्हात्रे, चिकणघरकल्याण-डोंबिवली मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याप्रमाणे उमेदवारी नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी ६ आॅक्टोबर ते १३ आॅक्टोबर १५ अशा केवळ आठच दिवसांचा कालावधी असताना ६ ते ९ आॅक्टोबर अशा चार दिवसांत एकाही पक्षाने अथवा अपक्ष उमेदवाराने नामनिर्देशन अर्ज भरलेला नाही. अथवा, अपक्ष उमेदवाराने नामनिर्देशन अर्ज भरलेला नाही. यावरून पितृपक्षात उमेदवारी अर्ज न भरणे, ही अंधश्रद्धा राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये वाढीस लागली आहे. अर्ज नेणे आणि सबमिट करण्यासाठी मुहूर्त बघितले जात आहेत. जवळजवळ सर्वच पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती घेऊन आठवडा झाला आहे. मात्र, कोणत्याही पक्षाने अद्याप उमेदवारांची नावेही जाहीर केली नाहीत. त्यासाठीदेखील मुहूर्त पाहणे सुरू आहे. यामुळे समाजाचे नेतृत्व करणाऱ्या प्रतिनिधींकडे सामाजिक अनिष्ट प्रथा आणि अंधश्रद्धा निर्मूलन करणारा प्रतिनिधी म्हणून पाहिले जाते. मात्र, हे राजकीय प्रतिनिधीच जर अर्ज भरणे आणि ते जमा करण्यासाठी पितृपक्षाचा अडसर मानत असतील तर अंधश्रद्धा वाढीस राजकारण्यांकडूनच बळ मिळत आहे, हे समोर येत आहे. शेवटच्या दिवशी गर्दी.. - १२ आॅक्टोबरला पितृपक्ष सायंकाळी संपणार आहे. तोपर्यंत १२ तारखेची अर्ज भरण्याची वेळ निघून जाणार आहे. मग, फक्त १३ आॅक्टोबर हा शेवटचा एकच दिवस उरणार असून अर्ज भरण्याची वेळ इतर दिवसांपेक्षा एक तासाने कमी असून ११ ते २ अशी आहे. यामुळे प्रत्येक अर्ज भरण्याच्या कार्यक्रमात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रचंड गर्दी होणार असून वेळ पुरणार नसल्याची स्थिती ओढवली तर अनेक इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यास मुकावे लागेल. - निवडणूक अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार चार दिवस ते केवळ बसून असून काहीच काम होऊ शकलेले नाही. याचा विचार राजकीय पक्षांनी करण्याऐवजी पितृपक्षाची भीती घेऊन अर्ज भरले गेले नाही, हेही स्पष्ट झाले.- ज्यांच्यावर सामाजिक परिवर्तनाची धुरा आहे, असे राजकारणीच अंधश्रद्धेला बळ देऊ लागले तर ती कमी होण्याऐवजी वाढण्याचीच शक्यता आहे. मग, अशा राजकारण्यांकडून समाजाने काय अपेक्षा ठेवाव्यात, हा प्रश्न मतदारांकडून उपस्थित केला जात आहे.
राजकारण्यांकडून अंधश्रद्धेला बळ
By admin | Published: October 10, 2015 12:01 AM