लसीकरणाच्या धडक मोहिमेसाठी यंत्रणा सज्ज
By admin | Published: October 8, 2015 12:12 AM2015-10-08T00:12:15+5:302015-10-08T00:12:15+5:30
ठाणे जिल्ह्यात पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांचे प्रमाण कमी असल्याने पुन्हा एकदा लसीकरणाची मोहीम धडाक्याने राबविण्यात येणार असून संबंधित सर्व आरोग्य यंत्रणा
ठाणे : ठाणे जिल्ह्यात पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांचे प्रमाण कमी असल्याने पुन्हा एकदा लसीकरणाची मोहीम धडाक्याने राबविण्यात येणार असून संबंधित सर्व आरोग्य यंत्रणा व महानगरपालिका यांनी चांगला समन्वय ठेऊन ही मोहीम यशस्वी करावी त्याचबरोबर अंगणवाड्यांनाही यात सहभागी करून घेण्यात यावे अशा सुचना निवासी उप जिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी वैद्यकिय अधिकाऱ्यांना दिल्या.
ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुके, महानगरपालिकांच्या क्षेत्रात या महिन्यांपासून ‘‘ इंद्रधनुष्य मिशन’’ चा दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या यशस्वितेसाठी
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत या मिशनच्या रूपरेषेविषयी चर्चा झाली.
लसीकरणापासून पूर्णत: वा अंशत: वंचित असलेल्या शून्य ते दोन वर्षे वयोगटातील बालके
आणि गरोदर मातांचे २०२०पर्यंत पूर्णत: लसीकरण करण्यासाठी
केंद्र सरकारने ही मोहीम सुरू
केलेली आहे. आज टास्क फोर्स समितीच्या समन्वय बैठकीत मिशन इंद्रधनुष्यच्या पहिल्या टप्प्याच्या फलनिष्पत्तीचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक बी. सी. केंपी पाटील, जिपचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनवणे, विविध महापालिकांचे आरोग्य अधिकारी उपस्थित होते. जागतिक आरोग्य संघटनेतर्फे निरीक्षण वैद्यकीय अधिकारी डॉ विनायक जळगावकर यांनी उपस्थितांना मिशन इंद्रधनुष्यच्या पुढील टप्प्याविषयी मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
पाच रोगांपासून
बालकांची सुरक्षितता
या मोहिमेतंर्गत जिल्हा आरोग्य विभागातर्फे नवजात अर्भकांना प्रत्येकी घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात यासोबतच कावीळ, क्षयरोग या लसीचाही यात समावेश करण्यात आला आहे.
त्यामुळे एकाच लसीकरणातून पाच रोगांपासून बालकाला सुरक्षितता लाभणार असल्याचे डॉ. जळगांवकर यांनी सांगितले. या लसीकरणाचे किमान काम झालेले देशातील २०१ जिल्हे यासाठी निवडण्यात आले आहे.
अपूर्ण लसीकरण, लसीकरणापासून वंचित बालके आणि गरोदर मातांचे प्रमाण जेथे किमान ५० टक्केंपर्यंत आहे, अशा ठिकाणांची निवड या मिशनसाठी करण्यात आली आहे. त्यात ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे.