राष्ट्रपती रामनाथ कोविंद रविवारी भार्इंदरमध्ये, सुमारे २०० लाभार्थींची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 01:11 AM2018-01-11T01:11:31+5:302018-01-11T01:11:53+5:30
राष्ट्रपती रामनाथ कोविंद रविवारी (दि. १४) सकाळी १०.३० वाजता उत्तन येथील केशवसृष्टीमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेवर आधारित कार्यक्रमासाठी येणार आहेत. या वेळी ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील केंद्र सरकारची मुद्रा योजना, स्कील्ड व स्टार्टअप इंडियाच्या लाभार्थ्यांना ते मार्गदर्शन करतील.
भार्इंदर : राष्ट्रपती रामनाथ कोविंद रविवारी (दि. १४) सकाळी १०.३० वाजता उत्तन येथील केशवसृष्टीमध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेवर आधारित कार्यक्रमासाठी येणार आहेत. या वेळी ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील केंद्र सरकारची मुद्रा योजना, स्कील्ड व स्टार्टअप इंडियाच्या लाभार्थ्यांना ते मार्गदर्शन करतील. त्यासाठी सुमारे २०० लाभार्थींची निवड करण्यात आली आहे. त्यांनी भारताच्या ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे कार्य केल्याने त्यांचा राष्टÑपतींच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.
या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागर राव, खासदार विनय सहस्रबुद्धे उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी कार्यक्रमाचा समारोप अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांच्या उपस्थितीत होणार असून राष्टÑपती या कार्यक्रमानंतर गोराई येथील पॅगोडाला भेट देतील.