शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंमुळे अदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
3
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
5
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
8
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
9
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
14
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
15
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
17
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
19
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
20
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?

पंतप्रधान आवास योजनेला भूखंड मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 5:13 AM

महापालिका हतबल : २५ हजार सदनिका कागदावरच

सुरेश लोखंडे

ठाणे : शहरातही प्रत्येकाला हक्काचे घर ‘पंतप्रधान आवास योजनेद्वारे’ मिळणार आहे. यासाठी ठाण्यासह जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिकांनी सुमारे २४ हजार ८७६ सदनिकांचे गृहप्रकल्पही हाती घेतले आहेत. परंतु, सरकारी भूखंडाच्या शोधासह सर्वेक्षण, तांत्रिक सल्लागार कंपन्यांच्या चक्रव्यूहात हे गृहप्रकल्प अडकले आहेत.

प्रत्येकास घर देण्याची केंद्र शासनाची ‘पंतप्रधान आवास योजना’ ही महत्त्वाकांक्षी योजना ग्रामीण भागासह शहरी भागात सुमारे २०१५ ते १६ पासून हाती घेतली आहे. परंतु, निष्काळजी व दुर्लक्षितपणातून गोरगरीबांसह मध्यमवर्गीयांची ही सुमारे २५ हजार घरे संबंधित पालिका प्रशासनाच्या कागदावरच असल्याचे दिशा समितीच्या आढावा बैठकीत दिसून आले. यामध्ये ठाणे महापालिकेच्या तीन हजार घरांच्या चार प्रकल्पांसह कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या १० हजार ४८४ घरे, नवी मुंबईतील चार हजार ४१४, मीरा-भार्इंदरच्या पाच हजार ६८ आणि अंबरनाथ पालिकेने हाती घेतलेल्या एक हजार ९१० घरांचा समावेश आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. डिसेंबरनंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी प्रत्येकास २०२२ पर्यंत घर देणारी ही महत्त्वाकांक्षी योजना हाती घेऊन ती अद्याप प्रस्तावांमध्येच घुटमळत आहे. नवी मुंबई महापालिकेनेदेखील चार हजार ४१४ घरांचा प्रकल्प हाती घेण्याचे नियोजन केले आहे. पण, त्यासाठी लागणाºया झोपडपट्ट्यांचे भूखंड जिल्हाधिकारी, सिडको आणि एमआयडीसीच्या मालकीचे आहेत. या भूखंडांच्या हस्तांतरणाच्या पाठपुराव्यात कासवगती आहे.भिवंडी महापालिका ७९ झोपडपट्ट्यांसाठी गृहप्रकल्प हाती घेत आहे. मात्र, सर्वेक्षणासाठी आतापर्यंत केवळ ४३८ कर्मचारी व २९ पर्यवेक्षक नियुक्त केले. तांत्रिक सल्लागाराच्या निविदा तीन वेळा काढूनही प्रतिसाद नाही. त्यानंतर, पुण्याच्या कंपनीसह घोडबंदरच्या कंपनीच्या निविदेपैकी आता स्पर्श प्रतिष्ठान या घोडबंदरच्या कंपनीला काम मिळाले. मीरा-भार्इंदर मनपाने पाच हजार ६८ घरांच्या प्रकल्पाचे नियोजन केले. या प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी चार ठेकेदारांना आता आदेश जारी केले. २७ हजार ५०७ झोपडपट्टीवासीयांपैकी १७ हजार २६२ झोपड्यांचे सर्वेक्षण झाले. त्यातील ६५० घरांचा प्रकल्प धावगी डोंगरी येथील लालबहादूर शास्त्रीनगरमध्ये हाती घेतला. तर, एक हजार २३९ घरांचा प्रकल्प भार्इंदर पश्चिमेकडील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरमध्ये घेतला आहे. या दोन्ही ठिकाणचे डीपीआर तयार झाले आहेत.याप्रमाणेच अंबरनाथ नगर परिषदेनेदेखील १४४.३८३ कोटी खर्चाचे गृहप्रकल्प हाती घेतले. ५२ झोपडपट्ट्यांपैकी २८ घोषित असून १४ अघोषित आहेत. त्यात सुमारे २६ हजार ५०४ लोकसंख्या आहे. त्यांच्या १६ हजार ४०८ घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले. यामध्ये सात हजार ७९९ घोषित झोपड्यांतील अर्जदार असून आठ हजार ६०९ अघोषित झोपडपट्टीतील अर्जदार आहेत. सध्या नवीन भेंडीपाडा येथे ३८२ लाभार्थ्यांसाठी ४२ कोटी ९९ लाखांच्या, तर घाडगेनगर येथे एक हजार ५२८ घरांसाठी सुमारे १७२ कोटींच्या प्रकल्पाचा डीपीआर तयार केला. या दोन्ही प्रकल्पांचे डीपीआर त्रुटींच्या चक्र व्यूहात आहेत.असे आहेत सदनिकांचे प्रस्तावठाणे महापालिकेच्या जिल्हाधिकाºयांच्या नियंत्रणातील बेतवडे येथील दोन भूखंडांसह म्हातार्डीगाव व डावले गावाजवळील भूखंडांवर हे चार प्रकल्प आहेत. यातील आतापर्यंत डावलेगावातील सर्व्हे नं. १९९ हा भूखंड महापालिकेकडे जिल्हाधिकाºयांनी हस्तांतरित केला. उर्वरित तीन भूखंड प्रस्तावातच अडकले आहेत. या चार प्रकल्पांमध्ये ठाणे महापालिका तीन हजार सदनिका बांधणार आहे.यापैकी पीएपीच्या एक हजार ८८ सदनिकांसह एएचपीच्या एक हजार २८४, एमआयजीच्या ६२८ घरांचा समावेश आहे. या प्रत्येक घराचे ३०० चौ. फूट चटईक्षेत्र आहे. सुमारे ४१४ कोटी रुपये खर्चूनही परवडणारी घरे भागीदारीतून व प्रकल्पबाधितांना मिळणार आहेत. पण, अद्याप भूखंड हस्तांतरणातच प्रस्ताव धूळखात आहेत.कल्याण-डोंबिवली महापालिकेने १० हजार ४८४ घरांचा बिग प्रकल्प हाती घेतला. पण, सल्लागार कंपन्यांकडून सर्वेक्षणाचे काम डिसेंबरअखेरपर्यंत केले जाणार आहे.

टॅग्स :PMRDAपीएमआरडीएHomeघरthaneठाणे