पेण टंचाई निवारणार्थ खासगी टँकर दाखल

By Admin | Published: April 14, 2016 12:09 AM2016-04-14T00:09:49+5:302016-04-14T00:09:49+5:30

पेण पंचायत समितीने टंचाई कृती निवारण समिती आराखड्यानुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या ज्या प्रतिबंधक उपाययोजना आखलेल्या होत्या, त्यानुसार खासगी टँकर चालकांची गतवर्षीची

Private tanker filing for pain reduction | पेण टंचाई निवारणार्थ खासगी टँकर दाखल

पेण टंचाई निवारणार्थ खासगी टँकर दाखल

googlenewsNext

पेण : पेण पंचायत समितीने टंचाई कृती निवारण समिती आराखड्यानुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या ज्या प्रतिबंधक उपाययोजना आखलेल्या होत्या, त्यानुसार खासगी टँकर चालकांची गतवर्षीची देयके देण्याबाबत यशस्वी तोडगा निघण्याच्या आशा कायम झाल्या आहेत. अधिग्रहण झालेल्या ६ टँकरपैकी, १० हजार लिटर क्षमतेचे ३ टँकर १२ एप्रिलपासून पाणीपुरवठा करण्यासाठी सज्ज झाले आहेत. लोकमतमधून या समस्येवर प्रकाश टाकून वृत्त प्रसिद्धी केल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सूत्रे हलविण्यात आली. अखेर खासगी टँकर पाण्याने भरून टंचाईग्रस्त वाडीवस्त्यांवर वेगाने पाणीपुरवठा करू लागले आहेत.
पेणच्या ५७ वाड्यावस्त्यांसह अनेक गावांमध्ये कमी दाबाने नळाला पाणी येत असल्याने सर्वच ठिकाणी पाण्यासाठी धावपळ करावी लागते. महिलांना कपडे, भांडी व इतर वापरासाठी पाणी मिळत नाही. खारेपाटात गोड्या पाण्याचे स्रोत नसल्याने एकमेव टँकर अथवा नळपाणी योजनेच्या पाण्यावरच सर्व व्यवहार करावे लागतात. फेब्रुवारी अखेरपासूनचा टंचाईचा प्रवास जीपीएस यंत्रणेच्या नव्या फॉर्म्युल्यामुळे टँकर चालकांचे लेणदेण व्यवहार शासकीय नियमांच्या चौकटीत अडले होते. अखेर लोकमतने याची दखल घेत लोकआग्रह व प्रशासनाला जागे केले. लोकमतानुसार प्रशासनाला जागे करून अखेर खासगी टँकर चालकांना पाठबळ देणारे वृत्त व जनमताचा भक्कम पाठिंबा या हेतूपोटी लोकमतने दिलेला दणका प्रभावी ठरून खासगी टँकर सेवा सुरू झाली. वेळापत्रकानुसार पाणी देण्याची व्यवस्था सुरू आहे. थोड्याच दिवसात आणखी ३ टँकर रुजू होतील. सहा खासगी व २ शासकीय अशा ८ टँकरद्वारे गाव व पाड्यावर पाणपुरवठा होणार आहे. लोकमतच्या या भूमिकेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Private tanker filing for pain reduction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.