उल्हासनगरात २ ते १२ जुलै दरम्यान जनता कर्फ्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 09:31 PM2020-07-01T21:31:50+5:302020-07-01T21:31:57+5:30
उल्हासनगरात कोरोना रुग्णाची संख्या २ हजारावर गेली असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिका आयुक्तांनी २ ते १२ जुलै दरम्यान जनता कर्फु जाहीर केले.
उल्हासनगर : शहरातील वाढती कोरोना च्या संख्येवर अंकुश ठेवण्यासाठी महापालिका आयुक्तांनी २ ते १२ जुलै दरम्यान जनता कर्फ्यु जाहीर केला. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये असे आवाहन त्यांनी करून मास्क विना बाहेर फिरणाऱ्या एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
उल्हासनगरात कोरोना रुग्णाची संख्या २ हजारावर गेली असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिका आयुक्तांनी २ ते १२ जुलै दरम्यान जनता कर्फु जाहीर केले. भाजीपाला, मटण, चिकन, फळे, दूध, बेकरी व जीवनावश्यक अन्नधान्याची दुकानें सकाळी ९ ते रात्री ९ वाजे पर्यंत सुरु राहतील. अन्नधान्य दुकानातून फक्त घरपोच धान्य वितरण करण्यात येणार आहे.
मेडिकल सकाळी ९ ते रात्री ९ वाजे पर्यंत, पीठ गिरणी, दारूचे दुकान सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत सुरु राहणार आहे. रेस्टॉरंट व होम किचन मधुन सकाळी १० ते रात्री १० वाजे पर्यंत होम डिलीव्हरी जेवण पुरविण्यात येणार आहे. रिक्षा, दुचाकी व चारचाकी गड्यासाठी नेहमीचे नियम राहणार असून नागरिकांना अत्यावश्यक कामा शिवाय बाहेर पडता येणार नाही. मास्क विना बाहेर फिरणाऱ्या एक हजार दंड आकारण्यात येणार आहे.
शहरातील कोरोनाची संख्या वाढत असल्याने विविध पक्षाच्या नेत्यासह व्यापारी संघटना, सामाजिक संस्था आदींनी महापालिका आयुक्तांकडे लॉक डाऊन ची मागणी केली होती.