केडीएमसीवर भाजपचा झेंडा फडकवा - कपिल पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 12:45 AM2020-01-24T00:45:34+5:302020-01-24T00:46:18+5:30

कल्याण-डोंबिवली आणि भाजप हे समीकरणच आहे. त्यामुळे आॅक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या केडीएमसीच्या निवडणुकीत पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याचा निर्धार करा

Put BJP's flag on KDMC - Kapil Patil | केडीएमसीवर भाजपचा झेंडा फडकवा - कपिल पाटील

केडीएमसीवर भाजपचा झेंडा फडकवा - कपिल पाटील

googlenewsNext

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली आणि भाजप हे समीकरणच आहे. त्यामुळे आॅक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या केडीएमसीच्या निवडणुकीत पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवण्याचा निर्धार करा, असे मार्गदर्शन भिवंडीचे भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी केले.
भाजपच्या कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्राचा मेळावा बुधवारी पार पडला. त्यावेळी पाटील बोलत होते. लोकसभा व विधानसभा निवडणुकांत कल्याणच्या मतदारांनी भाजपला चांगली साथ दिली. त्यामुळे त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रथम प्राधान्य द्यावे. संघटना मजबुतीकडे लक्ष द्यावे. गेल्या वेळी भाजपची संधी थोडक्यात हुकली होती. मात्र, आता केडीएमसीतील कार्यकर्त्यांनी एकदिलाने व मेहनतीने भाजपचा झेंडा फडकवावा, असे ते म्हणाले.

कल्याण-डोंबिवली आणि भाजप हे वर्षानुवर्षांचे समीकरण आपल्याला कायम ठेवायचे आहे. आजचा मेळावा हा केवळ भेटीगाठी व शुभेच्छा देण्यासाठी असला, तरीही येथून जाताना भाजपच्या विजयाचा निर्धार करा, असे पाटील यांनी सांगितले.
या मेळाव्यात महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा माधवी नाईक, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, नगरसेवक संदीप गायकर, प्रेमनाथ म्हात्रे, नगरसेवक अर्जुन भोईर, वरुण पाटील, दया गायकवाड व पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

सरकारची दमदार कामगिरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली सरकारची देशात दमदार कामगिरी सुरू आहे. राज्यात माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून राज्य सरकारवर अंकुश ठेवण्यात येत आहे, असेही पाटील पुढे म्हणाले.

Web Title: Put BJP's flag on KDMC - Kapil Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.