रेल्वे प्रवासी संघटनेचे सुरक्षा अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:46 AM2021-09-15T04:46:22+5:302021-09-15T04:46:22+5:30
डोंबिवली : रेल्वे परिसर स्वच्छ राहावा व प्रवाशांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी प्रत्येकाने प्रवासादरम्यान नियमित मास्क लावून सॅनिटायरचा उपयोग ...
डोंबिवली : रेल्वे परिसर स्वच्छ राहावा व प्रवाशांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी प्रत्येकाने प्रवासादरम्यान नियमित मास्क लावून सॅनिटायरचा उपयोग केला पाहिजे, रेल्वे आपली राष्ट्रीय संपत्ती आहे व ती सर्वांसाठी आहे, स्वच्छता राखा आरोग्य चांगले ठेवा, असे आवाहन मंगळवारी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष अभिजित धुरत यांनी केले.
संस्थेच्या माध्यमातून कल्याण, डोंबिवली स्थानकात मंगळवारी रेल्वे प्रवासी सुरक्षा व स्वच्छता जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. त्यावेळी संस्थेचे सरचिटणीस विजय जगन्नाथ सुर्वे म्हणाले, संपूर्ण देशात कोरोनाची महामारी तसेच पाऊस जोरात सुरू आहे. रेल्वे प्रशासनाने स्वच्छतेकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे, कचराकुंडीत कचरा टाकला की लगेच निर्जंतुक केला पाहिजे तसेच परिसरात फवारणी होणेसुद्धा गरजेचे आहे. डोंबिवली स्थानकात रेल्वे तिकीट घरांमध्ये जाऊन त्यांनी पास काढणाऱ्या प्रवाशांना आवाहन करून संरक्षित प्रवासाच्या सूचना दिल्या. त्यावेळी लोहमार्ग, आरपीएफ पोलिसांचे सहकार्य मिळाल्याचे संघटनेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले.
-----------