डोंबिवलीत राष्ट्रवादी काँग्रेसची राफेल विमान खरेदी घोटाळ्यात जनजागृती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 06:55 PM2018-11-10T18:55:30+5:302018-11-10T18:55:34+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोशल मीडिया कल्याण-डोंबिवली शहर जिल्हा अध्यक्ष निरंजन भोसले यांच्या संकल्पनेतून राफेल विमान खरेदी घोटाळा जनजागृती रॅली शनिवारी संपन्न झाली.

Rally in Dombivli, NCP's Rafale Aircraft Purchase Rally | डोंबिवलीत राष्ट्रवादी काँग्रेसची राफेल विमान खरेदी घोटाळ्यात जनजागृती रॅली

डोंबिवलीत राष्ट्रवादी काँग्रेसची राफेल विमान खरेदी घोटाळ्यात जनजागृती रॅली

Next

डोंबिवली: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोशल मीडिया कल्याण-डोंबिवली शहर जिल्हा अध्यक्ष निरंजन भोसले यांच्या संकल्पनेतून राफेल विमान खरेदी घोटाळा जनजागृती रॅली शनिवारी संपन्न झाली. रॅलीमध्ये कार्यकर्त्यांनी एकच नारा दिला होता. राफेल का दौर है, चौकीदार चोर है च्या घोषणांनी रॅली सुरू झाली होती. त्यावेळी कार्यकर्त्यांनी हातात घेतलेल्या फलकांमुळे नागरिकांमध्ये एकच चर्चेचा विषय झाला होता.

राफेल विमान प्रतिकृतीमुळे जनजागृती करायला अधिक सोप्पे झाल्याचे भोसले म्हणाले. राफेल हे एक उदाहरण असून केंद्र सरकार हे घोटाळयांचे सरकार आहे, अशी टीका त्यांनी केली. ही रॅली सकाळी ११.३० वा. कोपर रोड रेल्वे स्टेशन डोंबिवली पश्चिम येथून सुरू झाली व दुपारी १.३० वा. गावदेवी मंदिर, मानपाडा रोड, पांडुरंग विद्यालय समोर डोंबिवली पूर्व येथे समाप्त झाली. अतिशय योजनाबद्ध, शिस्तबद्ध वातावरणात त्याची पूर्तता झाल्याबद्दल भोसले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

प्रदेश सचिव समीर भोईर, डोंबिवली १४३ विधानसभा कार्याध्यक्ष भालचंद्र (भाऊ) पाटील, कार्याध्यक्ष राजेंद्र नांदोस्कर, जगदीश ठाकूर, समीर गुधाटे, शैलेश भोजने, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, जेष्ठ नेते सुरेश जोशी, नंदकुमार धुळे, मिलिंद भालेराव, महिला जिल्हा अध्यक्षा सारिका गायकवाड, कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्र महिला अध्यक्षा उज्ज्वला भोसले, पूजा पाटील, ज्येष्ठ नेते सरकटे, युवक जिल्हा अध्यक्ष सुधीर वंडार पाटील आदींसह मान्यवरांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे भोसले म्हणाले.

Web Title: Rally in Dombivli, NCP's Rafale Aircraft Purchase Rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.