कोरोनामुळे शाळेच्या फीमध्ये सवलत देण्यासंदर्भात राज्य शासनाने खूप उशिरा निर्णय घेतला. शाळा प्रशासनाने यापूर्वीच पालकांकडून फी आकारली आहे. त्यामुळे भरलेल्या फीमध्ये सवलत दिली जाईल, असे वाटत नाही. राज्य शासनाने स्पष्ट आदेश काढून भरलेली फीमधील १५ टक्के रक्कम पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये वर्ग करण्यात यावी, तरच शासनाच्या निर्णयाचा फायदा पालकांना आणि विद्यार्थ्यांना होईल.
-स्मिता चोणकर, पालक, बदलापूर
-----------------
उशिरा का होईना राज्य शासनाने निर्णय घेऊन पालकांना किंचित दिलासा दिला. या निर्णयाची शाळा प्रशासनाने योग्य अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. फी भरलेल्या पालकांना त्यांची १५ टक्के सवलतीची रक्कम पुढच्या शैक्षणिक वर्षात वर्ग करून दिली पाहिजे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात अशाच प्रकारची सवलत कायम ठेवली पाहिजे.
-गणेश जाधव, पालक, अंबरनाथ
-------------------
वाचली