ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदाच दिवसभरा एक लाखांचे विक्रमी लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 08:51 PM2021-09-04T20:51:49+5:302021-09-04T20:52:17+5:30

Coronavirus Vaccination : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्याने शनिवारी केली विक्रमी कामगिरी.

Record vaccination of one lakh in a day for the first time in Thane district | ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदाच दिवसभरा एक लाखांचे विक्रमी लसीकरण

ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदाच दिवसभरा एक लाखांचे विक्रमी लसीकरण

Next
ठळक मुद्देकोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्याने शनिवारी केली विक्रमी कामगिरी.

ठाणे : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्याने शनिवारी मात्र विक्रमी कामगिरी केली आहे. दिवसभरात तब्बल एक लाख एकहजार २९७ नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने लसीकरणाची ही पहिलीच वेळ आहे. जिल्ह्यातील या विक्रमी लसीकरणासह राज्यभरातही प्रथमच ११ लाख ६१ हजार नागरिकांचे लसीकरण शनिवारी करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील लसीकरणासह आतापर्यंत एकूण ५१ लाख २५ हजार ८७६ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले. त्यापैकी ३६ लाख ६८ हजार ९९४ नागरिकांना पहिल्या डोसचे, तर १४ लाख ५६ हजार ८८२ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. शनिवारी दिवसभरात लसीकरणाचे सुमारे ४६१ सत्र आयोजित करण्यात आले. 

ठाण्यात ५२ रुग्णांची नोंद
ठाण्यात ५२ रुग्णांची वाढ असून कल्याण डोंबिवलीमध्ये एकूण ११२ रुग्ण वाढी झाली. नवी मुंबईत ८० रुग्णांची वाढ व दोघांचा मृत्यू झाला आहे. उल्हासनगरमध्ये १० रुग्ण वाढ झाली असून भिवंडी परिसरात दोन रुग्ण सापडले आहे. मीरा भाईंदरमध्ये २८ रुग्णांची वाढ झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. अंबरनाथमध्ये १४ रुग्ण वाढले आणि बदलापूरमध्ये २१ रुग्णांची वाढ झाली आहे. तर जिल्ह्यातील गांवपाड्यात सहा रुग्ण सापडले आहे.

Web Title: Record vaccination of one lakh in a day for the first time in Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.