उल्हासनगर : शहरात मटका जुगार, ऑनलाईन लॉटरी, हुक्का पार्लर, गावठी दारूचे धंदे व रात्रभर चालणारे डान्सबार आदी अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी भाजप पदाधिकारी कपिल अडसूळ यांनी ठाणे पालकमंत्री शंभुराज देसाई यांना निवेदन दिले. पालकमंत्री शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
उल्हासनगरात गावठी दारूचे धंदे, चौकाचौकात सुरू असलेले ऑनलाइन लॉटरी, अंमली पदार्थाची विक्री, मटका जुगार, हुक्का पार्लर व रात्रभर सुरू असलेले डान्सबार आदींमुळे शहरात गुन्हेगारी वाढ झाल्याचे निवेदन भाजप पदाधिकारी कपिल अडसूळ यांनी पालकमंत्री शंभुराज देसाई यांना दिले. उल्हासनगर पोलीस परिमंडळ-४ च्या क्षेत्रातील उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आदी परिसरासह कल्याण पूर्वेच्या विधानसभा क्षेत्रातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे निवेदन भाजपचे पदाधिकारी कपिल अडसूळ यांनी पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी भेट दिलं.
स्थानिक आमदार कुमार आयलानी व पोलीस प्रशासनाला याकडे लक्ष घालण्यासाठी सांगावे असे निवेदनात म्हटले. गेल्या दोन दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात एकाने पोलिसांना शिवीगाळ घातल्याचा प्रकार घडला. तर धक्का लागला म्हणून एकाने फॉरवर्ड लाईन येथे एका इसमाची चाकूने हल्ला करून खून केल्याच प्रकार उघड झाले. त्यामुळे पोलीस आयुक्तानी याकडे दुलक्ष न करता कारवाई करावी. अशी मागणी अडसुळ यांनी पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्याकडे केली आहे.