कल्याण डोंबिवली महापालिकेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2018 03:12 PM2018-01-26T15:12:51+5:302018-01-26T15:13:07+5:30

कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेत भारतीय प्रजासत्‍ताक दिनाचा ६८ वा वर्धापन दिन समारंभ मोठया उत्‍साहात पार पाडला

Republic Day celebrations in Kalyan Dombivali Municipal Corporation | कल्याण डोंबिवली महापालिकेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

कल्याण डोंबिवली महापालिकेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

Next

कल्‍याण – कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेत भारतीय प्रजासत्‍ताक दिनाचा ६८ वा वर्धापन दिन समारंभ मोठया उत्‍साहात पार पाडला. महापालिका मुख्‍यालयात महापौर राजेंद्र देवळेकर आणि आयुक्‍त पी. वेलरासू यांचे उपस्थित तर डोंबिवली येथे उपमहापौर मोरेश्‍वर भोईर आणि डोंबिवली विभागाचे उप आयुक्‍त सुरेश पवार यांचे उपस्थितीत ध्‍वजारोहण करण्‍यांत आले. ध्‍वजारोहन केल्‍यानंतर महापौर राजेंद्र देवळेकर हे लोकशाही पंधरवाडया निमित्‍त  लोकशाही, निवडणूक व सुशासन या विषयावर बोलतांना म्‍हणाले की, लोकशाही सुदृढ करण्‍यासाठी नागरिकांनी आवश्‍यक त्‍या सर्व विषयावर सतत शिक्षणाद्वारे जागरुक राहणे आवश्‍यक आहे. भारतीय घटनेने या देशाच्या प्रत्येक नागरिकाला त्याचे  मत मांडण्याचा अधिकार दिला असून, नागरिकांनी लोकशाहीच्या बळकटी कारणासाठी ह्या अधकाराचा वापर करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
महा‍पालिका मुख्‍यालयात ध्‍वजारोहण संपन्‍न झाल्‍यानंतर आरोग्‍य विभागात उत्‍कृष्‍ठ काम करणा-या 11 सफाई कामगारांचा देखील सत्‍कार करण्‍यांत आला. तसेच स्‍वच्‍छ भारत अभियान स्‍वच्‍छता सर्वेक्षण २०१८ अंतर्गत शाळेच्‍या भिंती रंगविणा-या ५६ शाळांपैकी १० शाळांनी उत्‍कृष्‍ठ भिंतीचित्र रंगविल्‍याबद्दल त्‍यां शाळांचा देखील यावेळी सन्‍मानचिन्‍ह व प्रमाणपत्र देवून सत्‍कार करण्‍यात आला. या भिंत चित्रकला स्‍पर्धेसाठी चित्रकला शिक्षक अध्‍यापक संघ यांनी मोलाचे सहकार्य केले. भिंतीचित्र स्‍पर्धेमध्‍ये प्रथम पुरस्‍कार के.सी. गांधी हायस्‍कुल, कल्‍याण (प),द्वितीय पुरस्‍कार संवाद कर्णबधीर प्रबोधिनी शाळा, डोंबिवली (प), तृतिय पुरस्‍कार एन.आर.सी. हायस्‍कुल, मराठी माध्‍यम, मोहने, चतुर्थ पुरस्‍कार महात्‍मा गांधी विद्यालय, डोंबिवली (प), पाचवा पुरस्‍कार गणेश विद्यामंदिर, कल्‍याण (पूर्व) आणि उत्‍तेजनार्थ पुरस्‍कार शारदा विद्या मंदिर, कल्‍याण (प), स्‍वामी विवेकानंद विद्यामंदिर, अरुणोदय डोंबिवली (प), बिर्ला स्‍कुल, कल्‍याण (प), नवजीवन विद्यामंदिर, कल्‍याण(प),मोहिंदरसिंग काबलसिंग हायस्‍कुल , कल्‍याण (प) या शाळांनी पटकावला.

तद्नंतर डोंबिवली येथील कॅ.विनयकुमार सचान यांचे स्‍मारकास महापौर राजेंद्र देवळेकर आणि आयुक्‍त पी. वेलरासू यांनी पुष्‍पचक्र अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी उप महापौर मोरेश्वर भोईर, विरोधी पक्ष नेते मंदार हळबे, सभागृह नेते राजेश मोरे उपस्थित होते.

Web Title: Republic Day celebrations in Kalyan Dombivali Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.