भिवंडीत वीटभट्टीवरील २२ वेठबिगार मजुरांची सुटका

By नितीन पंडित | Published: January 7, 2024 05:21 PM2024-01-07T17:21:58+5:302024-01-07T17:23:51+5:30

भिवंडी :  वीटभट्टी मालकां कडून तालुक्यासह ठाणे व पालघर जिल्ह्यातील आदिवासी वीटभट्टी मजुरांची पिळवणूक करून त्यांना वेठबिगारी म्हणून राबवून ...

Rescue of 22 unemployed workers at brick kiln in Bhiwandi | भिवंडीत वीटभट्टीवरील २२ वेठबिगार मजुरांची सुटका

भिवंडीत वीटभट्टीवरील २२ वेठबिगार मजुरांची सुटका

भिवंडी:  वीटभट्टी मालकां कडून तालुक्यासह ठाणे व पालघर जिल्ह्यातील आदिवासी वीटभट्टी मजुरांची पिळवणूक करून त्यांना वेठबिगारी म्हणून राबवून घेण्याच्या तक्रारी वाढल्याने श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी शासकीय अधिकारी पोलिस यांच्या सोबतीने तालुक्यातील मैंदे गावातील वीटभट्टी वर छापा मारून १२ कुटुंबातील २२ वेठबिगार कामगारांची सोडवणूक केली आहे. 

तालुक्यातील मैंदे गावातील शेंदे पाडा येथे खांडपे येथील शशिकांत पाटील यांचा वीटभट्टी व्यवसाय असून त्या ठिकाणी त्यांनी मागील कित्येक वर्षां पासून मजूर म्हणून १२ आदिवासी कुटुंब विट बनविण्याचे काम करण्यासाठी अगाऊ रक्कम घेऊन करीत असताना, मालक शशिकांत पाटील यांनी कामगारांना त्यांच्या अंगावरील आगाऊ पैसे फिटत नाहीत तोपर्यंत दुसऱ्या कोणाकडे काम करण्यास मनाई करीत धमकावत मारहाण केली होती.या बाबतच्या तक्रारी समजल्यावर विवेक पंडित यांनी भिवंडी तहसीलदार कार्यालयातील तहसीलदार अधिक पाटील,पडघा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप गीते व संघटनेचे सरचिटणीस बाळाराम जाधव,प्रदेश उपाध्यक्ष विजय भोईर, जिल्हाध्यक्ष अशोक सपाटे,प्रवक्ता प्रमोद पवार तालुकाध्यक्ष सुनील लोणे,संगीता भोमटे यांसह वीटभट्टीवर सकाळी सहा वाजता छापा मारला.त्यावेळी आदिवासी मजुरांनी आपल्यावरील अन्यायाची कहाणी सांगितल्यावर सर्व १२ कुटुंबातील भारती साईनाथ जाधव, साईनाथ आश्रम जाधव दोन्ही रा.भावरपाडा ता.विक्रमगड,संगीत संदिप पवार संदिप काळुराम पवार दोन्ही रा. कानविंदे ता. शहापुर,अनिल शांताराम जाधव,अनिता अनिल जाधव दोन्ही रा. बिळघर ता. वाडा,सुनिल दशरथ मुकणे सुनिता सुनिल मुकणे दोन्ही रा. जाळे ता. वाडा,गणपत विठ्ठल पवार,अनिता गणपत पवार दोन्ही रा. नालासोपारा ता. वसई,संगीता चंद्रकांत वाघ,चंद्रकांत सुदाम वाघ दोन्ही रा.माण ता.विक्रमगड, विवेक रघुनाथ हिलोन,सविना विवेक हिलोम दोन्ही रा. विक्रमगड,अरुण लक्ष्मण सवर,पुष्पा अरून सवर दोन्हीं रा. माण ता. विक्रमगड,आदर्श विवेक हिलम अस्मीता आगर्श हिलम रा.बिलघर ता.वाडा,सारीका मनसुराम वाघ, मनसुराम विक्रम वाघ रा. जव्हार,मिरा दशरत मुकणे,दिनेश प्रविण जाधव रा.विक्रमगड जि. पालघर या २२ जणांना बंधमुक्त करीत यांच्या कुटुंबातील एकूण ४३ जणांची सुटका केली आहे.४३ जणांना तेथून मुक्त करीत त्यांच्या बिऱ्हाडासह पडघा पोलिस ठाणे गाठले. तेथे राजेश मुकणे यांनी दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी वीटभट्टी मालक शशिकांत पाटील यांच्या विरोधात वेठबिगारी मुक्ती कायद्यास अट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. 

देशाला स्वतंत्र मिळून ७५ वर्षे झाली तरी देशातील आदिवासी समाज आज ही अनेक सुविधांपासून वंचित आहेत. अनेकां कडे आधारकार्ड रेशनकार्ड नाही ,स्वतःच घरकुल नाही , सरकार कडे विनंती आहे वेठबिगार मुक्त करून भागणार नाही तर त्यांना त्यांच्याच गावात रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज आहे अशी प्रतिक्रिया श्रमजीवी संघटनेचे प्रवक्ता प्रमोद पवार यांनी दिली आहे. 

वेठबिगारीतून मुक्त झालेल्या सुनील ने फोडले बिंग-मागील महिन्यात २६ डिसेंबर रोजी तालुक्यातील चिंबिपाडा येथे सिद्दीकी शेख यांच्या वीटभट्टी वरील ११ वेठबिगार मजुरांची सुटका केली होती त्यामध्ये चाविंद्रा येथील सुनील भोये यासह त्याच्या कुटुंबीयांचा समावेश होता.तेथून सुटका झाल्यावर सर्व उसगाव येथील श्रमजीवी संघटनेच्या मुख्यालयात वास्तव्यास होता.सुनील याने श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या मुळे आपली वीटभट्टी मालकाच्या अत्याचारातून सुटका होऊन बंधमुक्त झाल्याने त्याने पुढाकार घेत मैंदे येथील आदिवासी मजुरांची भेट घेऊन आपली अत्याचारातून कशी सुटका झाली याची माहिती दिल्याने येथील आदिवासी मजुरांनी पुढे येऊन तक्रार करण्याची हिंमत दाखवली.

Web Title: Rescue of 22 unemployed workers at brick kiln in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.