पूर्वसूचना न देता केल्या जाणाऱ्या भूसंपादनामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 05:11 AM2019-05-20T05:11:07+5:302019-05-20T05:12:43+5:30
मुंबई-बडोदा राष्ट्रीय महामार्ग : नितीन गडकरी यांच्याकडे दाद मागणार
ठाणे : मुंबई-बडोदा राष्ट्रीय महामार्गासाठी बदलापूर परिसरात शेतजमीन संपादनास प्रारंभ होत आहे. मात्र, त्यासाठी बाधित शेतकºयांना जमीन अधिग्रहणाच्या पूर्वसूचना अद्यापही मिळाल्या नसल्याचा आरोप शेतकºयांकडून होत आहे. त्यास विचारात न घेताच भूमापन विभाग आणि राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अधिकारी शेतजमिनीचे मोजमाप करत असल्यामुळे शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याविरोधात संतापलेले शेतकरी लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे दाद मागण्याच्या तयारीत आहेत.
केंद्र सरकारच्या महत्त्वकांशी प्रकल्पांपैकी एक असलेल्या मुंबई-बडोदा राष्ट्रीय महामार्गासाठी अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर, चामटोली, दहिवली या गावांतील शेतकºयांच्या शेतजमिनींचे मोजमाप प्रशासनाकडून होत आहे. ज्या शेतकºयांना मोजणीच्या नोटिसा दिलेल्या आहेत, त्यांच्या जमिनीचे मोजमाप केले जात नसल्याचा आरोप संबंधित संतप्त शेतकºयांकडून होत आहे. मात्र, ज्यांना मोजणीच्या नोटिसा दिलेल्या नाहीत, त्यांच्या जमिनींचे मोजमाप केले जात असल्याचा आरोप संबंधित शेतकरी करत आहे. या मनमानीमुळे चामटोलीतील माजी सरपंच मोहन कोंडीलकर, सचिन जाधव, सदाशिव पाटील, गजानन भिडे, संतोष हिरमाळी, हरीश भाई आणि भोपी आदी शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या या मनमानीविरोधात शेतजमिनीचे संपादन करणारे अभियंता मिलिंद देशमुख आणि भूमापन अधिकारी मोरे यांना संबंधित शेतकºयांकडून जाब विचारला जात आहे. जमीन मोजमापाची पूर्वसूचना देणारी नोटीस मिळाल्याशिवाय मोजणी होऊ देणार नसल्याचा पवित्रा या शेतकºयांनी घेतला आहे. यातून शाब्दिक चकमकी उडत आहेत. त्यास आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागत असल्याचे वास्तव संबंधित बाधित शेतकरी बाळाराम जाधव यांनी सांगितले.
न्यायालयात जाता येऊ नये, म्हणून नोटीस नाही
शेतकºयांवर अन्याय करून या महामार्गासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाºयांकडून अन्यायकारी पद्धतीने शेतजमिनीचे संपादन केले जात आहे. ज्या शेतकºयांना नोटिसा दिल्या, त्यांच्या शेतजमिनीची मोजणी केली जात नाही. पण, ज्यांना नोटिसा दिलेल्या नाहीत, त्यांच्या शेतजमिनीची मोजणी केली जात आहे, असे या अधिकाºयांच्या मनमानीला बळी पडलेले बाधित शेतकरी जाधव यांनी निदर्शनात आणून दिले आहे. शेतकºयांनी न्यायालयात धाव घेऊ नये, म्हणून पूर्वसूचनेच्या नोटिसा न देता जमिनींचे मोजमाप केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याविरोधात गडकरी यांच्याकडे लेखी तक्रार करण्यासाठी शेतकरी लवकरच एकत्र येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले