उल्हासनगरात महापौरांनी घेतली आढावा बैठक, पर्यावरण दिनानिमित्त दिली हरीत शपथ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 04:01 PM2021-09-04T16:01:00+5:302021-09-04T16:01:16+5:30
Ulhasnagar News : उल्हासनगर महापालिकेवर शिवसेना मित्र पक्षाची सत्ता असून महापालिकेच्या विविध विभागात सावळागोंधळ निर्माण झाल्याची टीका होत आहे.
सदानंद नाईक
उल्हासनगर - गणेशोत्सवानिमित्त महापौर लिलाबाई अशान यांनी आयुक्तांच्या उपास्थित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन विकास कामाबाबत सूचना दिल्या. तसेच पर्यावरण विभागामार्फत माझी वसुंधरा अभियानातील हरीत शपथ महापौरांनी उपस्थितीना यावेळी दिली आहे.
उल्हासनगर महापालिकेवर शिवसेना मित्र पक्षाची सत्ता असून महापालिकेच्या विविध विभागात सावळागोंधळ निर्माण झाल्याची टीका होत आहे. दरम्यान महापौर लिलाबाई अशान यांनी गणेशोत्सव निमित्त शुक्रवारी आयुक्त डॉ राजा दयानिधी, उपायुक्त अशोक नाईकवाडे यांच्या उपस्थित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. सुरुवातीला त्यांनी देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे सांगून सर्वांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले. तसेच गणेश भक्तांनी बाप्पाच्या विसर्जनासाठी महापालिकेच्या मूर्ती संकलन केंद्राचा उपयोग करावा असा सल्ला गणेश मंडळ व गणेश भक्तांना दिला.
महापौरांनी आढावा बैठकीत केंद्र शासन व राज्य शासनामार्फत प्राप्त झालेल्या निधीतून सुरू असलेले काम वेळेत व मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. शहरात अपुर्ण कामांची माहिती घेऊन, ती पूर्ण करणे, सफाई कामगारांचे हजेरी शेड दुरुस्ती करणे, नामकरण केलेल्या रस्त्यांना एकाच आकाराचे व एकाच रंगाचे नामफलक लावणे, उल्हास स्टेशन स्कायवॉक, अग्निशमन विभाग अद्यावत मशिनरी व यंत्रणेसह ठेवणे, आवश्यकतेनुसार वाहन खरेदी करणे, उद्यान विभाग स्वतंत्र ठेवून, एजन्सी द्वारे कर्मचारी व देखभाल दुरुस्तीचा प्रस्ताव प्रस्तावित करणे. आवश्यकतेनुसार कर्मचारी निुयक्ती करणे तसेच पदोन्नतीचे प्रस्ताव प्रस्तावित करणे, महसुली उत्पनवाढी बाबतचे प्रस्ताव प्रस्तावित करणे, दिवाळीपूर्वी मालकी हक्काचे प्रस्ताव मार्गी लावणे. महापालिका एसटीपी प्लॅन, अद्यावत क्रिडा संकूल, मॅन होल साफ करण्याकरीता रोबोट अशा पुर्णत्वास आलेल्या कामाचे भूमीपूजन व उदघाटन मंत्री महोदयांच्या हस्ते करणे, महापौर व आयुक्त निवास, विश्रामगृह बांधण्याबाबतच्या प्रस्तावावर कार्यवाही करणे, एल.ई.डी. दिवे बसविणे, परीवहन सेवा सुरु करणे आदी अनेक विषयाला महापौरांनी हात घातला.
आढावा बैठकीतील विषय महत्वपूर्ण - महापौर अशान
महापौर लिलाबाई लक्ष्मण अशान यांनी आयुक्त डॉ. राजा दयानिधी व उपायुक्त अशोक नाईकवाडे यांच्या उपस्थितीत अनेक विषयावर चर्चा घडवून आणल्याने, बैठकीला वर्गाला स्वरूप आले. बैठकीला स्थायी समिती सभापती दिपक सिरवानी, सार्वजनिक विभागाच्या सभापती डिंपल ठाकूर, नगरसेवक अरुण अशान, कुलवंतसिंह सोहता, स्वप्निल बागूल, उपायुक्त (आरोग्य) मदन सोंढे, उपायुक्त सुभाष जाधव, वैद्यकिय अधिकारी डॉ. दीपक पगारे यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थितीत होते.