सुट्ट्या पैशांसाठी प्रवाशाला उभे राहावे लागले तासभर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:26 AM2017-07-31T00:26:50+5:302017-07-31T00:26:50+5:30

रेल्वे स्थानकात तिकीट काढण्यासाठी उभ्या असलेल्या प्रवाशाला सुट्टे पैसे नसल्याने तब्बल एक तास ताटकळत ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे.

sautatayaa-paaisaansaathai-paravaasaalaa-ubhae-raahaavae-laagalae-taasabhara | सुट्ट्या पैशांसाठी प्रवाशाला उभे राहावे लागले तासभर!

सुट्ट्या पैशांसाठी प्रवाशाला उभे राहावे लागले तासभर!

Next

डोंबिवली : रेल्वे स्थानकात तिकीट काढण्यासाठी उभ्या असलेल्या प्रवाशाला सुट्टे पैसे नसल्याने तब्बल एक तास ताटकळत ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. क्लार्ककडे सुट्टे पैसे असूनही ते न देता त्याने ताटकळत प्रवाशाने या प्रसंगाचे चित्रीकरण केल्याने रांगेतील अन्य प्रवाशांनी ओरडाआरडा केल्याने अखेर त्याला तिकीट देण्यात आले. त्यामुळे सुट्ट्या पैशांसाठी प्रवाशांची अडवणूक करण्याचा प्रकार पुन्हा उघड झाला. रेल्वे स्थानकातील तिकीट खिडक्यांवर दोन हजारांच्या नोटा अनेकदा स्वीकारल्या जात नाही, यावरही शिक्कामोर्तब झाले.
सागाव परिसरात राहणारे सचिन पाटील हे खाजगी कंपनीत कामाला आहेत. रविवारी सुट्टी असल्याने त्यांनी पत्नी व मुलांना घेऊन मुंबईला जाण्याचे ठरवले.  तिकीट काढण्यासाठी ते रांगेत उभे राहिले. नंबर आल्यावर त्यांनी त्यांच्याजवळची दोन हजारांची नोट पुढे केली. तेव्हा तिकीट क्लार्कने पैसे सुट्टे नाहीत. सुट्टे पैसे घेऊन या तेव्हाच तिकीट मिळेल, असे सांगितले. पाटील यांनी तिकीट क्लार्कसमोर ठेवलेल्या सुट्ट्या पैशांकडे बोट दाखवून सुट्टे पैसे असतानाही  तिकीट का देत नाही, याचा जाब विचारला. तेव्हा ‘घरुन सुट्टे पैसे घेऊन येत जा. उगाच दुसºयांचा वेळ वाया घालवू नका,’ अशी शेरेबाजी क्लार्कने केली आणि त्यांना तिकीट न देता तब्बल एक तास ताटकळत ठेवले.  क्लार्कचा उद्दामपणा सुरु असल्याचे पाहून पाटील यांनी त्यांच्या मोबाइलमध्ये क्लाकपुढे असलेले सुट्टे पैसे व त्याची उत्तरे याचे चित्रीकरण केले. रागाच्या भरात क्लार्कने पाचशेच्या चार नोटा काढून ‘हे घ्या सुट्टे, निघा आता,’ असा सल्ला पाटील यांना दिला. तेव्हा पाटील यांनी ‘मला तिकीट द्या. मी सुट्टे घेण्यासाठी आलेलो नाही,’ असे बजावले, तेव्हा कुठे त्यांनी तिकीट दिले. 

Web Title: sautatayaa-paaisaansaathai-paravaasaalaa-ubhae-raahaavae-laagalae-taasabhara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.