ठाणे: मुंबई पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातल्या शाळादेखील ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. याबद्दलचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिले आहेत. मुंबई, ठाणे परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यानं शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यात सहा मोठ्या महानगरपालिका आहेत. त्यात ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी, उल्हासनगर, मिरा-भाईंदर महापालिकांचा समावेश होतो. जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानं शाळा सुरू केल्यास विषाणूचा फैलाव अधिक वेगानं होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी संपूर्ण जिल्ह्यातल्या शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच, ९वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांबाबतही घेतला महत्त्वाचा निर्णयतत्पूर्वी आज सकाळी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी शहरातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाला दिले. मुंबईतल्या शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.गेल्या काही दिवसांत मुंबईतील कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली. मात्र दिवाळी आणि सणावारांच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या गर्दीमुळे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे खबरदारीची बाब म्हणून मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळा ३१ दिवसांपर्यंत बंद ठेवण्याची घषोणा केली आहे. तसेच २३ नोव्हेंबरपासून सुरू होणारे ९ ते १२वीचे वर्गही सुरू न करण्याचे आदेशा पालिका आयुक्तांनी दिले आहे.
मुंबई पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातल्या शाळाही ३१ डिसेंबरपर्यंत बंद; पालकमंत्र्यांचे आदेश
By कुणाल गवाणकर | Published: November 20, 2020 6:29 PM