‘सुरक्षा काढणे हे सुडाचे राजकारण’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 12:54 AM2019-11-09T00:54:28+5:302019-11-09T00:55:14+5:30
काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी काँग्रेस अध्यक्ष, खासदार राहुल गांधी
ठाणे : देशाच्या एकता आणि एकात्मतेसाठी बलिदान देणाऱ्या गांधी घराण्याची एसपीजी सुरक्षा काढणे म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे असे सुडाचे राजकारण असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी केली. सुडाच्या राजकारणाचा अंत हा नेहमीच वाईट असतो, हा जगाचा इतिहास सत्ताधाऱ्यांनी तपासून पाहावा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी काँग्रेस अध्यक्ष, खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांच्या सुरक्षेत केंद्र सरकारने कपात केली आहे. हा निर्णय म्हणजे सुडाचे राजकारण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या देशाच्या इतिहासातील हा सर्वात काळा दिवस आहे. ज्या सोनिया गांधींनी आपल्या सासूचे पार्थिव आपल्या मांडीवर घेतले. ४६ गोळ्या त्यांच्या छातीत घुसल्या होत्या. रु ग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. तेव्हा राहुल आणि प्रियंका लहान होते. सहा वर्षांनंतर आपल्या वडिलांचा छिन्नविछिन्न चेहराही ते बघू शकले नाहीत. पतीच्या पार्थिवाचे दर्शनही सोनियांना झाले नाही. राजीव गांधी यांची एवढी निर्घृणपणे हत्या झाली होती. देशाच्या एकात्मतेसाठी गांधी घराण्याने दोन बलिदाने दिली आहेत. त्याच गांधी घराण्याचे सुरक्षाकवच काढणे, हा निव्वळ माणुसकीला अपमानित करणारा संदेश आहे.
असे राजकारण अंतापर्यंत नेते
राजकारणात माणुसकी असावी, मानवी धर्म पाळला जावा; हे साधारण संकेत आहेत. पण, ज्या पद्धतीने भाजप आणि संघ वागते आहे, त्याकडे पाहिल्यावर हे संस्कार आणि संस्कृती नव्हे. अटलबिहारी वाजपेयी जेव्हा आजारी पडले, तेव्हा पंतप्रधान असलेल्या राजीव गांधी यांनी अटलबिहारी यांची भेट घेऊन त्यांना मामा असे संबोधून संसदीय समितीचे प्रमुख बनविले. त्यांना अमेरिकेत पाठवून त्यांच्यावर उपचार करून घेतले. ही संस्कृती ज्या घराण्याने रु जवली, विद्वेष असला तरी मतमतांतरे बाजूला ठेवली.
विद्वेष आणणे अयोग्य
च्सुसंवाद कायम ठेवला. त्या भारताच्या राजकारणामध्ये इतका टोकाचा विद्वेष आणणे चांगले नाही. सुडाचे राजकारण अंतापर्यंत घेऊन जाते; हा अंत चांगला नसतो, अशी टीका आव्हाड यांनी केली आहे. अशा प्रकारे सुरक्षा काढणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.