शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
2
Maharashtra News: भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री, काय आहे कारण?
3
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
4
Srishti Tuli : "मी गळफास घेत आहे"; महिला पायलटने आत्महत्येआधी बॉयफ्रेंडला केलेला Video कॉल
5
PMJAY-Scam : पंतप्रधान जन आरोग्य योजनेत मोठी फसवणूक! पैसे कमावण्यासाठी १८ वर्षाच्या मुलाची अँजिओप्लास्टी!
6
महत्त्वाच्या खात्यांसाठी महायुतीत लॉबिंग; शिंदेसेना, अजित पवारांना कुठली खाती हवीत?
7
नाना पटोले संघाचे हस्तक, त्यांना RSS मध्येच पाठवा, काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराचा गंभीर आरोप  
8
Raj Kundra BREAKING: राज कुंद्राच्या घरी ईडीचे धाडसत्र, कार्यालयातही झाडाझडती
9
भांडुपच्या शाळेत बदलापूरची पुनरावृत्ती! शाळेच्या तळघरात तीन मुलींची विनयभंग, आरोपीला अटक
10
ICC Champions Trophy संदर्भात फायनली काय ठरणार ते आज तरी कळणार का?
11
मला पक्षाचं चिन्ह मिळालं पण...; काँग्रेसच्या बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप
12
Astrology Tips: सलग १० शुक्रवार करा 'हे' उपाय; लक्ष्मी घरातून काढणार नाही पाय!
13
"या चांडाळामुळे.…’’, काका पशुपती पारस यांची चिराग पासवान यांच्यावर बोचरी टीका  
14
लग्नानंतर ५ व्या दिवशी मृत्यूने गाठलं, नववधूसोबत आक्रित घडलं; आंघोळीला बाथरुममध्ये गेली अन्...
15
Astro Tip: कोणत्या गोष्टी केल्या असता घरात असलेली लक्ष्मी स्थिर राहते? जाणून घ्या!
16
आयुष्याची नवी सुरुवात! 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे अडकली लग्नबंधनात, फोटो आले समोर
17
दुसऱ्या पत्नीला प्रॉपर्टीत अधिकार मिळतो का? पतीच्या मालमत्तेचे खरे वारसदार कोण? काय आहे कायदा?
18
Adani Group Stocks: 'या' सेगमेंटमध्ये अदानींच्या शेअर्सची एन्ट्री; ३ शेअर्सनं पकडला तुफान स्पीड, तुमच्याकडे आहे का?
19
"लॉरेन्स बिश्नोई गँगसाठी अमेरिका..."; शार्प शूटरचा खळबळजनक खुलासा
20
नाना पाटेकरांना कशाची भीती वाटते? म्हणाले, "ना मृत्यूची ना कोणा व्यक्तीची पण...."

शहापूर-मुरबाड-खोपोली रस्त्याचे तूर्त सहा मीटर रुंदीपर्यंतच काम करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 4:48 AM

ठाणे : वाढते अपघात आणि निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे चर्चेत असलेल्या शहापूर-मुरबाड-खोपोली रस्त्याचे तूर्त सहा मीटर रुंदीपर्यंतच काम करावे. उर्वरित ...

ठाणे : वाढते अपघात आणि निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे चर्चेत असलेल्या शहापूर-मुरबाड-खोपोली रस्त्याचे तूर्त सहा मीटर रुंदीपर्यंतच काम करावे. उर्वरित रुंदीकरण भूसंपादनानंतर करण्याचे निर्देश केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी बुधवारी दिले. संबंधित रस्ता एमएसआरडीसीकडे सोपवून मोठी चूक केल्याचे पाटील यांनी नमूद करीत राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

शहापूर-मुरबाड-खोपोली राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची दुरवस्था, अपुरी कामे आणि भूसंपादनासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी बैठक घेतली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला आमदार किसन कथोरे, दौलत दरोडा, माजी आमदार गोटीराम पवार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती वंदना भांडे, दशरथ तिवरे आदींची उपस्थिती होती.

शहापूर-मुरबाड-खोपोली रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. त्याचे काम केंद्र सरकारने एमएसआरडीसीकडे सोपविल्याने मोठी चूक झाली. या कामाचा दर्जा निकृष्ट असून, एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी होेत नाही. अनेक अपघात होत असून, ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत, अशी टीकाही पाटील आणि आमदार कथोरे यांनी केली. या रस्त्याचे काम काही ठिकाणी ३० मीटर करण्यात येत आहे. मात्र, रस्त्याच्या मालकीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पुरावेच नाहीत. १९७७ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे एवढी जागा असणे शक्य नव्हते. त्यामुळे सध्या केवळ सहा मीटर रुंद रस्त्याचे काम पूर्ण करावे. उर्वरित रस्त्याचे रुंदीकरण शेतकऱ्यांना पैसे दिल्यानंतर जमिनी ताब्यात घेऊन करावे, असे आदेश पाटील यांनी दिले. मूळ जमीनमालक आणि सध्या जमिनीवर बांधकाम केलेल्या नागरिकांमधील वादावर स्थानिक नेत्यांनी समन्वय साधून मार्ग काढावा, असे आवाहनही पाटील यांनी केले.