ठाणे: आपल्या आगळ््या वेगळ््या संकल्पनेद्वारे प्रत्येक वेळी रसिकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण करणाºया अभिनय कट्ट्यावर यंदा फिल्मी चक्करचे आयोजन करण्यात आले होते. शशी कपूर स्पेशल कार्यक्र माने रसिकांना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. जमलेल्या सर्वच रसिक प्रेक्षकांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात शशी कपूर यांना अलविदा केले.प्रारंभी प्रार्थना व ज्येष्ठ प्रेक्षक प्रतिनिधी मधुकर पंडित यांच्या हस्ते नटराजाचे पूजन पार पडले. विजया साळुंखे हिने ‘भान ठेवा’ या एकपात्रीद्वारे सादरीकरणास आरंभ केला तर परेश दळवी याने ‘एकच प्याला’ या अजरामर कलाकृतीतील एकपात्री उत्तमरित्या वठवली. अनिकेत शिंदे याने फ्युजन साँगवर ताल धरत आपल्या नृत्याची झलक प्रेक्षकांना दाखवली. यानंतर सुरु झाले शशी कपूर स्पेशल. चित्रपटसृष्टीत आपल्या अदाकारीने शशी कपूर यांनी आपले अनोखे स्थान निर्माण केले होते. अनेक चित्रपटांतून विविध सहाय्यक भूमिकांद्वारे त्यांनी सहाय्यक भूमिका या किती महत्वाच्या असतात याचा आदर्श नवीन कलाकारांसमोर ठेवला. त्या काळातील या हॅण्डसम कपूरची विविध पात्रे साकारायला कट्टेकरी सज्ज होते. निलेश भगवान (शेखर गुप्ता )आणि वीणा छत्रे यांनी ‘त्रिशूल’ या चित्रपटातील प्रसंग उत्तमरित्या वठवला तर हितेश नेमाडे आणि योगेश मंडलिक यांनी ‘मिस्टर रोमियो’ या चित्रपटातील प्रसंगाद्वारे शशी कपूर यांच्या सक्सेनाची आठवण करून दिली. ‘दिवार’ या चित्रपटातील विजय हे पात्र आणि शशी कपूर यांंनी रंगवलेले पोलीस इन्स्पेक्टर रवी हे कट्ट्याच्या गणेश गायकवाड आणि संकेत देशपांडे यांनी उत्तम रंगवले. यावेळी ‘मेरे पास मा है’ या त्यांट डायलॉगने पुन्हा एकदा टाळ््या घेतल्या. कल्पेश डुकरे याने ‘जब जब फुल खिले’ या सिनेमातील त्यांचे राजा हे पात्र रंगवले आणि शिवानी देशमुख हिने त्याला उत्तम साथ दिली.आज स्पेशल काय मध्ये ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटाच्या स्किट स्वरूपातील सादरीकरण शेवटचे ठरले. हितेश नेमाडे दिग्दर्शित या सादरीकरणात वैभव (गोपाल), आदित्य (माधव), प्रशांत (लक्ष्मण २ ), परेश (लक्ष्मण १ ), रोहित ( लकी), हर्षदा (अॅना ), स्वप्नील (वासू रेडी) आणि निलेश (पप्पी भाई ) यांच्या भूमिका होत्या. कार्यक्र माच्या शेवटी कट्ट्याचे अध्यक्ष किरण नाकती यांनी प्रेक्षकांशी संवाद साधताना अभिनेते-दिग्दर्शक-निर्माते शशी कपूर यांच्या जीवन प्रवासावर भाष्य केले. कट्ट्याच्या निवेदनाची धुरा ही संकेत देशपांडे यांनी सांभाळली होती.
ठाण्यातील अभिनय कट्ट्याच्या ३५६ व्या कट्ट्यावर सादरीकरणाद्वारे शशी कपुरांना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 3:44 PM
शशी कपूर स्पेशल या फिल्मी चक्करमध्ये कट्ट्याच्या कलाकारांनी त्यांच्या अनेक गाजलेल्या चित्रपटातील पात्र रंगवत शशी कपूर यांना अनोखी आदरांजली वाहिली.
ठळक मुद्दे३५६ व्या कट्ट्यावर सादरीकरणाद्वारे शशी कपुरांना आदरांजलीशशी कपूर स्पेशल कार्यक्र माने रसिकांना मिळाला जुन्या आठवणींना उजाळाकिरण नाकती यांनी शशी कपूर यांच्या जीवन प्रवासावर केले भाष्य