शिवसेनेचा जि. प. सदस्य कोठडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 01:56 AM2018-01-20T01:56:05+5:302018-01-20T01:56:13+5:30

कारिवली गावात वीजग्राहकांच्या तक्रारीवरून दुरूस्तीसाठी गेलेल्या कर्मचाºयांना शिवसेनेचा जिल्हा परिषद सदस्य, सरपंचासह त्यांच्या भावाने मारहाण केल्याने त्यांना शुक्रवारी भिवंडी कोर्टात हजर केले

Shivsena district Par. Member detained | शिवसेनेचा जि. प. सदस्य कोठडीत

शिवसेनेचा जि. प. सदस्य कोठडीत

Next

भिवंडी : कारिवली गावात वीजग्राहकांच्या तक्रारीवरून दुरूस्तीसाठी गेलेल्या कर्मचाºयांना शिवसेनेचा जिल्हा परिषद सदस्य, सरपंचासह त्यांच्या भावाने मारहाण केल्याने त्यांना शुक्रवारी भिवंडी कोर्टात हजर केले. त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
गेल्या महिन्यात कारिवलीत वीजतक्रारी वाढल्याने टोरेन्ट कंपनीच्या दुरूस्ती पथकाने गावात जाऊन दुरूस्तीची कामे सुरू केली. तेव्हा गावातील एका जमावाने कर्मचाºयांना शिवीगाळ करीत मारहाण केल्याने कंपनीच्या अधिकाºयांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात १५ ते २० जणांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यातील काहींना अटक झाली होती. परंतु जिल्हा परिषद सदस्य गोकुळ नाईक, कारिवलीचे सरपंच देवराज नाईक आणि त्यांच्या भाऊ नीलम यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. तो फेटाळल्यामुळे ते उच्च न्यायालयात गेले. पण कोर्टाने त्यांना पोलीस ठाण्यात हजर होण्यास सांगितले.

Web Title: Shivsena district Par. Member detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.