कल्याण : कल्याण आरटीओ हद्दीत सध्या ४३ हजार रिक्षा रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, टिटवाळा स्टेशन परिसर हे रिक्षांनी व्यापलेले आहेत. रिक्षांची संख्या वाढल्याने स्टॅण्डही अपुरे पडत आहेत. स्टॅण्डमधील रिक्षा बाहेर रस्त्यावर येऊ लागल्याने स्टेशन परिसरातील वाहतूककोंडीत अधिकच भर पडत आहे.
राज्य सरकारच्या मुक्त परवाना धोरणामुळे कल्याण आरटीओ हद्दीत ४३ हजार रिक्षा आहेत. रिक्षा जास्त व प्रवासी कमी, असे चित्र दिसून येत आहे. निकषानुसार एक लाख लोकसंख्येमागे ७०० रिक्षा असणे आवश्यक आहे. मात्र, कल्याण-डोंबिवलीत रिक्षांची संख्या १० ते १५ हजार रिक्षांच्या घरात पोहोचली आहे. तर, अन्य रिक्षा टिटवाळा, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरांत आहेत.
कल्याण पश्चिमेला रेल्वेस्थानकाबाहेर एक भले मोठे रिक्षास्टॅण्ड आहे. तेथून उल्हासनगरमधील कॅम्प नंबर १ ते ३ पर्यंत जाण्यासाठी रिक्षांच्या तीन मोठ्या रांगा लागतात. याशिवाय काही रिक्षाचालक रांगेव्यतिरिक्त रिक्षाचालक संघटनेच्या कार्यालयासमोरून भाडे घेतात. त्याचबरोबर विरुद्ध दिशेला अन्य काही रिक्षाचालक रिक्षा आडव्या लावतात. टांगा आणि रिक्षास्टॅण्ड असलेल्या जागेतून लालचौकी, खडकपाडा येथे जाणाऱ्या रिक्षांच्या तीन रांगा लागतात. तसेच तेथे शेजारीच मुख्य रस्त्यावर रिक्षा उभ्या राहतात. त्याच्याविरुद्ध दिशेपासून बसडेपो व साधना हॉटेलपर्यंत टाटानाका, सूचकनाका, भिवंडी, बैलबाजार, पत्रीपुलाकडे जाणाऱ्या रिक्षा उभ्या असतात. रेल्वे तिकीट आरक्षण केंद्रासमोर रस्त्याच्या आतील बाजूला रिक्षास्टॅण्ड आहे. त्यामुळे स्टेशन परिसरात रिक्षांचा भरणा पाहायला मिळतो.
रिक्षास्टॅण्डमधून भाडे घेऊन बाहेर पडणाºया रिक्षाचालकांची साइड भाडे भरणारे रिक्षाचालक अडवणूक करतात. तसेच बस डेपोतून बाहेर पडणाºया व डेपोच्या आत येणाºया बसला मार्गच उपलब्ध नसतो. खडकपाडा, मोहने या दिशेला जाणाºया कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहनच्या बसला उभ्या राहण्यासाठी जागा नसते. दीपक हॉटेलसमोर रिक्षा आडव्यातिडव्या उभ्या केल्या जातात. याठिकाणाहून बिर्ला कॉलेज, प्रेम आॅटो, सिंडिकेट येथे साइड भाडे भरले जाते. मात्र, या रिक्षाचालकांविरोधात काहीच कारवाई केली जात नाही. रिक्षाचालक वाहतूक पोलीस व वॉर्डनला दाद देत नाही. चौक तिथे रिक्षास्टॅण्ड अशी स्थिती आहे. त्यामुळे सर्वत्रच रिक्षांची गर्दी झाल्याचेदिसत आहे.डोंबिवलीच्या कोंडीतही पडतेय भरडोंबिवली पूर्वेत आणि पश्चिमेतही अशीच स्थिती आहे. पूर्वेतील इंदिरा गांधी चौक हा चारही बाजूने स्टॅण्डने वेढला आहे. एसटीचा पनवेलचा बसथांबा हा रिक्षाचालक व लोढासंकुलाचे भाडे भरणाºया टॅक्सीचालकांनी व्यापलेला असतो. त्यामुळे इंदिरा गांधी चौकातून मार्ग काढणे जिकिरीचे होते. तसेच अरुंद रस्त्यांमुळे कोंडीत अधिक भर पडते. केळकर रोडवरील रिक्षास्टॅण्डची रांग पार रामकृष्ण हॉटेलपर्यंत लागते. त्यामुळे पादचाऱ्यांना चालणेही अवघड होत आहे.च्पश्चिमेला द्वारका हॉटेल, रसरंजन हॉटेल, जुन्या विष्णूनगर पोलीस ठाण्यासमोरील रिक्षास्टॅण्ड आहे. केडीएमसीचे तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांनी पश्चिमेतील रेल्वेस्थानक परिसरातील दुकाने तोडून अतिक्रमण हटवले. त्याठिकाणी बसथांबे केले. मात्र, या मोकळ्या जागेवरून रिक्षाचालक साइड भाडे घेत आहेत. त्यामुळे मोकळी जागाही रिक्षाचालकांनी बळकावली आहे.च्पश्चिमेला फलाट क्रमांक १ च्या बाहेर ठाकुर्ली दिशेला रिक्षाचालक मनमानीपणे रिक्षा उभ्या करतात. तेथून गणेशनगर, गरिबाचावाडा, सुभाष रोड, चिंचोड्याचापाडा, नवापाडा, कुंभारखाणपाडा येथे रिक्षा जातात. रिक्षाचालकांमुळे तेथे कोंडीत भर पडते.च्डोंबिवलीत कोंडीवर मात करण्यासाठी एलिव्हेटेड रिक्षास्टॅण्डचा प्रस्ताव मंजूर आहे. त्याची निविदा काढली जात नाही.