लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: गेली अनेक दिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रखडलेल्या उपअधीक्षक तसेच सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्याचे आदेश गृहविभागाने बुधवारी काढले आहेत. तब्बल १०५ अधिका-यांपैकी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाला सहा सहाय्यक आयुक्तांची तर ठाणे ग्रामीणसाठी दोन आणि पालघर जिल्हयासाठी एका उपअधीक्षकाची नियुक्तीचे आदेश राज्याच्या गृहविभागामार्फत काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोरोना या साथीच्या आजारामुळे राज्यभर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे गेली अनेक दिवस सहायक पोलीस आयुक्त या दर्जाच्या अधिका-यांच्या बदल्या आणि नियुक्त्या रखडल्या होत्या. ३० सप्टेंबर रोजी गृहविभागाने काढलेल्या आदेशानुसार १०५ अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये गोंदिया जिल्हयातील देवरीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत ढोले यांना ठाणे शहर आयुक्तालयात बदली मिळाली आहे. गोंदियाच्याच मुख्यालयातील उपअधीक्षक सोलानी ढोले यांचीही ठाणे शहरमध्ये बदली झाली आहे. त्याचबरोबर औरंगाबाद ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश सातव, पालघर येथील डहाणूचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार धर्माधिकारी आणि ठाणे जिल्हा जात पडताळणी समितीच्या उपअधीक्षक संगीता शिंदे आदींचीही ठाणे शहरमध्ये बदली झाली आहे. याशिवाय, अकोला येथील जात पडताळणी समितीचे उपअधीक्षक विलास सानप आणि रत्नागिरीतील चिपळूणचे उपअधीक्षक नवनाथ ढवळे या दोघांना ठाणे ग्रामीणमध्ये संधी मिळाली आहे. त्यातील सानप यांना मीरा रोड तर ढवळे यांना शहापूरच्या उपविभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मुंबई उपनगराच्या जात पडताळणी समितीचे उपअधीक्षक धनाजी नलावडे यांना धर्माधिकारी यांच्या जागी डहाणू (जि. पालघर) मध्ये आणण्यात आले आहे. परभणीच्या पूर्णा येथील उपविभागीय अधिकारी श्रीकृष्ण कर्डिले यांना उपअधीक्षक म्हणून ठाणे नागरी हक्क संरक्षण विभागात नियुक्ती देण्यात आली आहे. तर पालघरचे विभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांची नागपूर शहर पोलीस आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे. हे आदेश गृह विभागाचे उप सचिव कैलास गायकवाड यांनी काढले आहेत. प्रशासकीय कारणास्तव या बदल्या असून बदलीच्या ठिकाणी संबंधित अधिका-यांनी तातडीने हजर होण्याचे आदेशही बजावण्यात आले आहेत.
ठाणे शहर आयुक्तालयासाठी मिळाले सहा सहाय्यक पोलीस आयुक्त
By जितेंद्र कालेकर | Published: October 01, 2020 10:23 PM
गेली अनेक दिवस जात पडताळणीसारख्या साइड पोस्टींगवर असलेल्या उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना आता कार्यकारी पोस्टींगवर नियुक्तीची संधी मिळाली आहे. अशा चार अधिकाऱ्यांची ठाणे आणि पालघर जिल्हयात बदली झाली आहे.
ठळक मुद्देठाणे ग्रामीणसाठी दोन तर पालघरमध्ये एकाची नियुक्ती साईड ब्रॅन्चमधून अनेकांच्या झाल्या बदल्या