...तर मुंबईमध्ये आम्ही चक्काजाम करू — ढवळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 06:11 AM2018-03-10T06:11:50+5:302018-03-10T06:11:50+5:30
गेल्या २ ते ३ वर्षांपासून राज्य तसेच केंद्र सरकार दिलेली आश्वासने पूर्ण करत नाहीत. शेतक-यांचा ऐतिहासिक संप झाला, त्यावेळी शासनाने पूर्ण कर्जमाफी जाहीर केली. ३४ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. मात्र, १० ते १५ टक्के सुध्दा कर्जमाफी झाली नाही.
वासिंद - गेल्या २ ते ३ वर्षांपासून राज्य तसेच केंद्र सरकार दिलेली आश्वासने पूर्ण करत नाहीत. शेतकºयांचा ऐतिहासिक संप झाला, त्यावेळी शासनाने पूर्ण कर्जमाफी जाहीर केली. ३४ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. मात्र, १० ते १५ टक्के सुध्दा कर्जमाफी झाली नाही.
२००६ मध्ये कसेल त्याच्या नावावर जंगल जमीन करणे, या पारित कायद्याची १२ वर्षांत अंमलबजावणी झालेली नाही. मागे शेतकºयांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकला एक लाखाचा मोर्चा काढला होता. तरीही असंवेदनशील सरकारवर काही परिणाम झाला नाही. कर्जबाजारीपणामुळे सुमारे ७५ हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र, आता महाराष्ट्र शासनाने शेतकºयांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर ५० हजार मोर्चेकरी शेतकरी पूर्ण मुंबई जाम करतील, असा निर्वाणीचा इशारा अखिल भारतीय किसान सभा अध्यक्ष कॉ. डॉ. अशोक ढवळे यांनी वासिंद येथे दिला. शुक्रवारी दुपारी हा मोर्चा वासिंद येथील मुंबई - नाशिक महामार्गालगतच्या भव्य मैदानावर काही काळ जेवणपाण्यासाठी विसावला.