वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ठाण्यातील मीनाताई ठाकरे उड्डाणपूलावरुन दुतर्फा वाहतूक सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 05:01 PM2020-12-08T17:01:39+5:302020-12-08T19:30:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शहरातील अंतर्गत वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तसेच वाहन चालकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी बाबुभाई पेट्रोल पंप ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शहरातील अंतर्गत वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तसेच वाहन चालकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी बाबुभाई पेट्रोल पंप ते कॅसल मिल दरम्यान उभारलेल्या उड्डाणपूलावरु न अखेर दुतर्फा वाहतूकीला सुरुवात करण्यात आली आहे. स्थानिक रहिवाशांसह आमदार संजय केळकर यांनीही याबाबतची मागणी केली होती. याठिकाणी दुहेरी वाहतूक सुरु झाल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
वाहतूक कोंडी मुक्त शहराची संकल्पना पोलीस उपायुक्त पोलीस पाटील यांनी वाहतूक शाखेचा पदभार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली होती. त्याच पार्श्वभूमीवर सर्वप्रथम त्यांनी सेवा रस्त्यांवर अनधिकृत पार्र्किं गवर कारवाईचा बडगा उगारला. त्यापाठोपाठ सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी तीन हात नाका ते कोपरी हा सेवा रस्ता एकेरी केला. मात्र दुपारी आणि रात्री याठिकाणी दुतर्फा वाहतूक सुरु ठेवण्यात आली. कॅसलमिल येथे उभारलेल्या उड्डाणपूल आधी एकमार्गी होता. या उड्डाणपूलामूळे माजीवडा नाक्यावरु न येणाऱ्या वाहनांना थेट जेल तलाव अथवा एलबीएस मार्गावर उतरता येते. पण त्याचवेळी एलबीएस मार्गावरु न माजीवडा नाक्याच्या दिशेने जाणाºया वाहनांना बाबूभाई पेट्रोल पंपासमोरील बॉटल नेक रस्त्याच्या स्थितीमूळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्याच पार्श्वभूमीवर या उड्डाणपूलावरील वाहतूक दुतर्फा करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी वाहतूक नियंत्रण शाखेकडे केली होती. याची गांभीर्याने दाखल घेत, वाहतूक नियंत्रण शाखेच्या अधिकाऱ्यांनीही या परिसराची पुन्हा पाहणी केली. त्यानंतर या उड्डाणपूलावरु न दुहेरी वाहतूक सुरु करण्याचा निर्णय पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी घेतला. त्यानुसार या पूलावरु न आता दुहेरी वाहतूक सुरु केली आहे. उड्डाणपूलावरु न दुहेरी वाहतूक सुरु झाल्याची माहिती वाहन चालकांना होण्यासाठी बॅरिकेटस टाकण्याचे कामही सुरु केले आहे. दुहेरी वाहतूकीमूळे प्रामुख्याने सायंकाळच्या वेळेत एलबीएस मार्गावरु न माजीवडा नाक्याकडे जाणाºया वाहनचालकांचा वेळ वाचणार आहे.
‘‘ वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून बाबूभाई पेट्रोल पंप या परिसराची पाहणी करण्यात आली होती. त्यानंतर स्व. मीनाताई ठाकरे उड्डाणपूलावरु न दुहेरी वाहतूक सुरु केली आहे. ’’
बाळासाहेब पाटील, पोलिस उपायुक्त, ठाणे शहर वाहतूक आयुक्तालय.