पदपथांवरील २१५० अतिक्र मणांवर धडक कारवाई
By admin | Published: October 17, 2015 01:48 AM2015-10-17T01:48:45+5:302015-10-17T01:48:45+5:30
शहरातील पदपथांवरील अतिक्र मणे तोडण्याची धडक कारवाई सुरूच असून आजपर्यंत या कारवाईमध्ये २१५० अतिक्र मणे तोडली आहेत.
ठाणे : शहरातील पदपथांवरील अतिक्र मणे तोडण्याची धडक कारवाई सुरूच असून आजपर्यंत या कारवाईमध्ये २१५० अतिक्र मणे तोडली आहेत. ही मोहीम अधिक कडक करण्याचे आदेश मनपा आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत.
शहरातील पदपथ नागरिकांना चालण्यासाठी मोकळे राहावेत, यासाठी महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार १० दिवसांपूर्वी त्यावरील अतिक्र मणे तोडण्याची जोरदार मोहीम सुरू केली. गेल्या १० दिवसांपासून तिने अधिक जोर धरला असून यापुढे ती अधिक तीव्र करण्यात येणार आहे. या कारवाईअंतर्गत आजपर्यंत नौपाडा प्रभाग समितीअंतर्गत ३८१ अतिक्र मणे, रायला व वागळेत ५०७ अतिक्र मणे, उथळसरमध्ये २५७ अतिक्र मणे, माजिवडा-मानपाडामध्ये १९८ अतिक्र मणे, कळव्यामध्ये २०० तर मुंब्रा-दिव्यामध्ये २५२ अतिक्र मणे तोडली आहेत. कोपरी प्रभाग समितीत १२८ एवढी तर वर्तकनगर आणि सावरकरनगर प्रभाग समितीत ३२७ अतिक्र मणे तोडण्यात आली.