ठाणे: आत्महत्त्येचा विचार हा कोणत्याही व्यक्तीच्या मनात येऊ शकतो. त्यासाठी वय, लिंग, सुशिक्षित - अशिक्षीत असा भेदभाव नसतो. आत्महत्त्या करण्याची इच्छा एखादी व्यक्ती बोलून दाखवत असेल तर तिचे योग्य समुपदेश केले पाहिजे. आत्महत्त्या प्रतिबंध करु शकतो असे मत प्रादेशिक मनोरुग्णालयाचे मनोविकृतीतज्ञ परिचारक संदेश धामणीकर यांनी व्यक्त केले. जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह अंतर्गत बुधवारी खोपट येथील एसटी स्टॅण्ड येथे आत्महत्त्या प्रतिबंध या विषयावर धामणीकर यांनी मार्गदर्शन आणि आपल्या व्याख्यानाद्वारे जनजागृती केली. यावषीर्ची थीम प्रतिबंध करुया आत्महत्त्येचा, प्रसार करुया मानसीक आरोग्याचा ही असून या अनुषंगाने विविध ठिकाणी व्याख्याने दिली जात आहेत. आत्महत्त्येचा दोन प्रकार असून त्यात अॅक्टीव्ह आणि पॅसीव्ह हे आहेत. ज्याच्या मनात फक्त आत्महत्त्येचा विचार येतो आणि ते तो बोलून दाखवतो याला पॅसीव्ह आत्महत्त्या म्हणतात तर ज्या व्यक्तीच्या मनात विचार येतात, तो ते व्यक्त करतो आणि त्याचबरोबर तो आत्महत्त्या करण्याची योजनाही आखतो उदा. फाशी लावून घेणे, उडी मारणे. कोणत्याप्रकारे आत्महत्त्या करता येईल याचा विचार तो व्यक्त करतो त्याला अॅक्टीव्ह आत्महत्त्या म्हणतात. अशा रुग्णांमध्ये कोणत्या प्रकारची लक्षणे दिसतात यावर सांगताना धामणीकर म्हणाले, त्या व्यक्तींमध्ये उदासीनता, नैराश्य येते, कोणत्याही गोष्य्टीत आनंद घेण्याची इच्छा लोप पानते, भविष्याबाबत आशा राहत नाही, माझा जगाला उपयोग नाही अशा प्रकारे नैराश्य येऊन आत्महत्त्येचा विचार मनात येतात. अशा वेळी या रुग्णांना सेल्फ मॅनेजमेंट आणि सिटींग मेडीकल अॅडव्हाईज या दोन पद्धतीने आत्महत्त्येपासून परावृत्त करता येते. कोणताही रुग्ण हा थेट आत्महत्त्या करत नाही, तो त्याच्या जवळच्या/विश्वासू व्यक्तीकडे ही इच्छा बोलून दाखवतो, अशा व्यक्तीचे सेल्फ मॅनेजमेंटमध्ये समुपदेशन केले जाते. सिटींग मेडीकल अॅडव्हाईजमध्ये अशी व्यक्ती नातेवाईकांच्या मदतीने मनोरुग्णालयात किंवा मानसोपचारतज्ज्ञांकडे जाते त्यांच्याकडे मनातले विचार व्यक्त करते, अशा व्यक्तीला वैद्यकीय सल्ला दिला जातो, तसेच, वेगवेगळ््या थेरपी दिल्या जातात. त्यांच्यात सकारात्मक विचार आणून त्यांचे बहुमुल्य जीवन वाचवता येते असे धामणीकर यांनी सांगितले. मानसीक आरोग्य कसे सुधरावे याबद्दल सांगताना ते म्हणाले, सततच्या ताणतणावामुळे आत्महत्त्येचा विचार मनात येतो. त्यामुळे समतोल आहार, वैयक्तीक स्वच्छता आणि शांत झोप तसेच, नियमीत व्यायामाची गरज आहे. या कार्यक्रमाला एसटी महामंडळाचे विक्रम गायकवाड यांचे सहकार्य लाभले. यावेळी मनोरुग्णालयाचे व्यवसाय उपचार तज्ज्ञ सुधीर पुरी, जान्हवी केरझारकर, वैशाली लोखंडे व इतर उपस्थित होते.
आत्महत्त्या प्रतिबंध करु शकतो : मनोविकृतीतज्ञ परिचारक संदेश धामणीकर यांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2019 5:32 PM
प्रादेशिक मनोरु ग्णालय ठाणे येथे शुक्रवारपासून जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
ठळक मुद्देप्रादेशिक मनोरु ग्णालय ठाणे येथे शुक्रवारपासून जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहआत्महत्त्या प्रतिबंध करु शकतो : संदेश धामणीकर प्रतिबंध करुया आत्महत्त्येचा, प्रसार करुया मानसीक आरोग्याचा