सुरेश म्हात्रे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; अजित पवारांच्या उपस्थितीत हातावर बांधळ घड्याळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 03:01 PM2021-12-02T15:01:36+5:302021-12-02T15:03:19+5:30

केंद्रीय पंचायत राज मंत्री खासदार कपिल पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून सुरेश म्हात्रे परिचित आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सेना भाजप युती असतांनाही म्हात्रे यांनी मंत्री पाटील यांच्या विरोधात जाहीर बंड पुकारले होते.

Suresh Mhatre joins NCP in the presence of Ajit Pawar | सुरेश म्हात्रे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; अजित पवारांच्या उपस्थितीत हातावर बांधळ घड्याळ

सुरेश म्हात्रे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; अजित पवारांच्या उपस्थितीत हातावर बांधळ घड्याळ

googlenewsNext

भिवंडी- ठाणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मुख्य उपस्थितीत म्हात्रे यांनी राष्ट्रवादीच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात झालेल्या जाहीर कार्यक्रमावेळी राष्ट्रवादीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

केंद्रीय पंचायत राज मंत्री खासदार कपिल पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून सुरेश म्हात्रे परिचित आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सेना भाजप युती असतांनाही म्हात्रे यांनी मंत्री पाटील यांच्या विरोधात जाहीर बंड पुकारले होते. तेव्हापासून म्हात्रे हे चर्चेत होते. गेल्या पाच ते सहा महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नव्हता. मागील काही दिवसांपासून ते काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या मात्र गुरुवारी त्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केल्याने आता सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. 

सुरेश म्हात्रे यांच्या पक्ष प्रवेशामुळे ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद निश्चितचपणे वाढणार असून म्हात्रे यांना राष्ट्रवादी संपूर्ण राजकीय ताकद देईल, असे आश्वासन व प्रतिक्रिया यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. 

तर माझी कोणावरही नाराजी नाही तसेच कोणासोबतही स्पर्धा नसून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपल्यावर दाखविलेला विश्वास आपण पूर्णपणे सार्थ ठरवू आणि पक्ष जी जबाबदारी देईल ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करू, असे सुरेश म्हात्रे यांनी म्हटले आहे.

Web Title: Suresh Mhatre joins NCP in the presence of Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.