२७ गावांची ‘ती’ जाहिरात स्थगित

By Admin | Published: October 17, 2015 03:16 AM2015-10-17T03:16:13+5:302015-10-17T03:16:13+5:30

ऐन निवडणुकीच्या आचारसंहिता काळातच २७ गावे मनपातून वगळण्याबाबतची सुनावणी शासनाने १६ आणि १७ आॅक्टोबरला लावली .

Suspended the 'those' advertisement of 27 villages | २७ गावांची ‘ती’ जाहिरात स्थगित

२७ गावांची ‘ती’ जाहिरात स्थगित

googlenewsNext

चिकणघर : ऐन निवडणुकीच्या आचारसंहिता काळातच २७ गावे मनपातून वगळण्याबाबतची सुनावणी शासनाने १६ आणि १७ आॅक्टोबरला लावली . त्या अनुषंगाने मनपाने हरकतदारांना सुनावणीसाठी पाचारण करणारी जाहिरात १३ आॅक्टोबरच्या वृत्तपत्रांतून केली होती. मात्र, ती मतदारांना प्रलोभन ठरणार असल्याची तक्रार सेनेने निवडणूक आयुक्तांना केली. ती तक्रार ग्राह्य मानून आयोगाने या सुनावणीला २ नोव्हेंबरपर्यंत स्थगिती दिली असल्याची पुनर्जाहिरात पालिकेने दिली. (वार्ताहर )
१४ आॅक्टोबरची सुनावणी १९ आॅक्टोबरला
२७ गावांचा मनपात समावेश केल्याच्या शासनाच्या भूमिकेविरुद्ध २७ गावांतून उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेवरील १४ आॅक्टोबरची सुनावणी आणखी पाच दिवस पुढे ढकलली असून आता ही सुनावणी १९ आॅक्टोबरला होणार असल्याची माहिती याचिकाकर्ते तथा २७ गावे सर्वपक्षीय संरक्षण हक्क समितीचे सचिव चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Web Title: Suspended the 'those' advertisement of 27 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.