मीरा रोड : मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते मीरा रोड येथे होणा-या भूमिपुजनांच्या कार्यक्रमाची जाहिरात किंवा बातमी गुरूवारी छापून आणल्यास पाच हजार आणि कार्यक्रम झाल्याची बातमी छापून आल्यावर तीन हजार रुपये रोख देण्याचे पत्रकच भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी काढले आहे. मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्याची आपल्या बाजूने बातमी देण्यासाठी भाजपाने चक्क पैशांची आॅफर देत पत्रकारांना विकत घेण्याचा जाहीर प्रयत्न केल्याने निषेधाचा सूर उमटू लागला आहे. हे पत्रक काढणारे जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता मी कामात व्यस्त असून नंतर बोलतो, असे सांगत त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.मीरा रोडच्या एस. के. स्टोन येथील मैदानात महामार्ग प्राधिकरणाने गुरूवारी भूमिपुजनाचा कार्यक्रम ठेवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते एकाच ठिकाणी प्रतिकात्मक स्वरुपात भूमिपुजन केले जाणार आहे.भाजपा आमदार तथा स्थानिक नेते नरेंद्र मेहता यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी चालवली आहे. भाजपाने तर सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपुजन होणार असल्याचे जाहीर करत सोशल मीडियासारख्या माध्यमातून जोरदार प्रचार चालवला आहे. त्याच्या निमंत्रणांचा धडाका लावला आहे.महापौरांच्या ई-मेलवरुन भाजपाचे जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी अनेकांना या कार्यक्रमाच्या जाहिरातीचा मजकूर आणि सोबत संपादक/व्यवस्थापक यांच्या नावे स्वत:ची सही असलेले पत्र पाठवले आहे.पत्रासोबत जोडलेल्या जाहिरातीचा मजकूर शासकीय दरात प्रसिध्द करण्यासह विविध अटीशर्ती टाकल्या आहेत. तळटीप म्हणून ११ तारखेला-कार्यक्रमाच्या दिवशी जाहिरात किंवा बातमी छापल्यास पाच हजार रुपये आणि कार्यक्रम झाल्यानंतर दुसºया दिवशी बातमी छापल्यास तीन हजार रुपये देण्याचे लेखी नमूद केले आहे.पत्रक ारांनी आपल्या बाजूने बातम्या द्याव्या, म्हणून पत्रकारांना लेखी स्वरुपात पैशांचे आमिष दाखवल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. पंतप्रधान तसेच मुख्यमंत्र्यांसह भाजपा नेतृत्वाच्या पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त कारभाराच्या धोरणालाच तिलांजली देताना लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा भाजपाने बाजार मांडल्याने निषेध आणि टीकेची झोड उठू लागली आहे.- वस्तुत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येणार असल्याने भाजपाच्या दृष्टीने हा कार्यक्रम हे एकप्रकारे शक्तिप्रदर्शनच आहे. शिवाय शहराच्या विकासकामांचा धडाका त्यात असल्याने भरपूर निधीची घोषणा केल्याने पक्षाला वेगळ््या प्रसिद्धीची आवश्यकताच नव्हती.
भाजपाची बातमी छापा, आठ हजार घेऊन जा! पक्षाचे पत्रक, कार्यक्रमाचे ‘नियोजन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 5:41 AM