बदली प्रक्रियेवर शिक्षकांचा आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 01:15 AM2019-06-15T01:15:05+5:302019-06-15T01:15:10+5:30
जिल्हा परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह : विरोध केल्याने निलंबनाची धमकी
अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या सुमारे २४५ प्राथमिक शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या या समुपदेशनाद्वारे करण्यात येत आहेत. मात्र, अपेक्षित असलेल्या ठिकाणी नेमणूक होत नसल्याने शिक्षकांनी शुक्रवारी गोंधळ घातला. नेमून दिलेल्या ठिकाणी गेला नाही, तर निलंबित करण्यात येईल, अशी धमकी प्रशासन आणि पदाधिकारी यांच्याकडून दिली जात असल्याने बदली प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होत नसल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या शिवतीर्थ इमारतीमध्ये सुरू होती. शिक्षकांच्या या भूमिकेमुळे जिल्हा परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
उन्हाळी सुट्टींनंतर १७ जूनपासून जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू होत आहेत. त्याआधी रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या बदल्यांचा कार्यक्रम रायगड जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे. रायगड जिल्ह्यात पाचव्या व सहाव्या टप्प्यातील शिक्षकांची जिल्हांतर्गत समुपदेशनाने बदली प्रक्रिया शुक्र वारी सुरू झाली. या बदली प्रक्रियेसाठी सुमारे २४५ शिक्षकांनी अर्ज केले होते. समुदेशनासाठी एका-एका शिक्षकाला आत बोलावण्यात येत होते. त्या वेळी नियमानुसार शिक्षकांनी त्यांच्या पसंतीच्या २० शाळा सुचवल्या होत्या. मात्र, त्यातील एकही शाळा त्यांना न देता दुसऱ्याच शाळांवर त्यांची नेमणूक करण्यात येणार होती. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी दिसून आली. सुचवलेल्या २० शाळांपैकी एकही शाळा न देता अन्य शाळा देण्याआधी त्या शाळेच्या जवळपासची शाळा देण्याची मागणी केली होती. नेमून दिलेल्या शाळेवर हजर व्हा, अन्यथा निलंबित करू, अशी तंबी दिल्याने शिक्षकांनी टिपणीस सभागृहाबाहेर गोंधळ घातल्याचे दिसून आले.
सुमारे ४० शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पनवेल, कर्जत, उरण आणि खालापूर तालुक्यातील शाळा संपल्याचे शिक्षकांना सांगण्यात आले. तालुक्यातील समांतर धोरणानुसार बदली प्रक्रिया राबविल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. यावर शिक्षकांनी आक्षेप घेतल्याने बदली प्रक्रियेवर संशयाच्या भोवºयात सापडल्याचे दिसत होते.
बदली प्रक्रि या आम्हाला मान्य नसल्याचे निवेदन काही शिक्षकांनी दिल्यानंतर वातावरण काहीसे निवळले. याबाबत न्यायालयात दाद मागण्याचा निर्धारही शिक्षकांनी व्यक्त केला. मात्र, यानंतरही प्रशासनाने बदली प्रक्रि या सुरू ठेवली होती.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, शिक्षण समिती सभापती नरेश पाटील, प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, शिक्षण अधिकारी बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, प्रभारी शिक्षणाधिकारी बाळासाहेब थोरात यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
च्शासन निर्णयात समांतर बदली प्रक्रि या राबविण्याचा उल्लेख नाही.
च्बदली प्रक्रि येत समाविष्ट शिक्षकांची तसेच शाळांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही.
च्बदली प्रक्रि या राबविताना अधिकाऱ्यांनी मनमानीपणे कारभार केला.
च्पनवेल, कर्जत, उरण, खालापूर तालुक्यात जवळपास ८० शाळांमधील जागा रिक्त असताना फक्त ४० शिक्षकांची बदली प्रक्रि या पूर्ण झाल्यानंतर या तालुक्यांंमधील शाळांची बदली प्रक्रि या पूर्ण कशी झाली.