शहापूरच्या सापगावात २० दिवसांत १० जणांचा लेप्टो स्पायरोसिसने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 06:06 PM2020-11-20T18:06:04+5:302020-11-20T18:09:59+5:30

ठाणे जिल्हा परिषदेला खडबडून जाग; कोरोना संकटात लेप्टोचा शिरकाव

Ten people died in 20 days due to leptospirosis in Shahapur | शहापूरच्या सापगावात २० दिवसांत १० जणांचा लेप्टो स्पायरोसिसने मृत्यू

शहापूरच्या सापगावात २० दिवसांत १० जणांचा लेप्टो स्पायरोसिसने मृत्यू

Next

ठाणे : सध्या कोरोनाच्या महासंकटाने हैराण असतानाच शहापूर तालुक्यातील सापगांव येथील दहा ग्रामस्थांचा वीस दिवसांत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या विषयी ठाणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाँ. मनिष रेघे, यांना बोलते केले असता त्यांनी 'या ग्रामस्थांचा 'लेप्टो स्पायरोसीस' या आजाराने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

शहापूर या आदिवासी तालुक्यातील दुर्गम भागात सापगांव हे तीन हजार लोकवस्तीचे गांव आहे. अवघ्या २० दिवसांच्या कालावधीत दहा जणांचा मृत्यू झाल्याच्या या घटनेने ठाणे जिल्हा परिषद खडबडून जागी झाली आहे. शुक्रवारी आरोग्य समिती सभापती कुंदन पाटील व डॉ. रेघे यांनी या गावाला भेट देऊन येथील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी सुरु केली आहे. त्यात डेंग्यू च्या तुलनेत लेप्टो स्पायरोसीस या आजाराचे सिमटंन्स, लक्षणे आढळून आली आहे. तेथे त्वरीत आरोग्य कँम्प लाऊन ग्रामस्थांवर डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टो स्पायरोसिसचा उपचार सुरु केल्याचे डाँ. रेघे यांनी लोकमतला सांगितले.

वीस दिवसाच्या कालावधीत दगावलेल्यांमध्ये तरुणांसह, ४० ते ४५ वयाचे नागरिक आणि महिलांचा समावेश आहे. अवघ्या वीस दिवसात येथील पाच तरुणांसह पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे. या ग्रामस्थांना विविध साथीच्या आजाराने ग्रासल्याचे निदर्शनास येताच जिल्हा परिषद सदस्या वंदना भांडे, यांनी तत्काळ आरोग्य विभागाशी संपर्क करून उपचार सुरु करण्याची मागणी लाऊन धरली. त्यास अनुसरुन आता या गावांत आरोग्य यंत्रणा सतर्क होऊन युद्धपातळीवर उपचार सुरू केले आहे. या दरम्यान माजी आमदार पांडुरंगबरोरा, उपसभापती जगन पष्टे, गटविकास अधिकारी भवारी, शहापूर आरोग्य अधिकारी तरुलता धानके, जेष्ठ नेते किशनशेठ भांडे, काशिनाथ तिवरे, विलास गगे, निलेश भांडे, विनायक सापळे, मनोज धानके आदी या घटनेवर लक्ष ठेवून आहे.

Web Title: Ten people died in 20 days due to leptospirosis in Shahapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.