उल्हासनगरात नेपाळी वॉचमन गँगची दहशत
By सदानंद नाईक | Published: May 26, 2024 09:29 PM2024-05-26T21:29:05+5:302024-05-26T21:29:42+5:30
कालीमाता मंदिरातील चोरी प्रकरणी, पोलीस पथके नेपाळी वॉचमनच्या मागावर
उल्हासनगर: कॅम्प नं-४ येथील प्रसिद्ध कालीमाता मंदिरातील दागिन्यांच्या चोरी प्रकरणी पोलीस पथक वॉचमन गॅंगच्या मागावर असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवल यांनी दिली. मुकुट फायनन्स, सोन्याचे दुकान आदी मुख्य चोरी प्रकरणात नेपाळी गँगचा सहभाग उघड झाला असून नेपाळी गँगने शहरात दहशद निर्माण केली.
उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील ७० वर्ष जुन्या कालीमाता मंदिरात ४ दिवसांपूर्वी कामाला ठेवलेल्या वाचमनने एका साथीदाराच्या मदतीने मंदिरातील गर्भगृहातून देवीच्या दागिन्यांची चोरी केल्याचे उघड झाले. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांचे पथके वॉचमनसह साथीदारांच्या मागावर असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवल यांनी दिली. चोरटे लवकरच पोलीस ताब्यात असतील असे संकेतही पोलिसांनी दिले. यापूर्वी भाटीया चौकातील गोदावरी इमारतीच्या एका उधोगपतीच्या घरी, मुकुट फायनन्स कार्यालयात, कॅम्प नं-१ येथील सोनार गल्लीतील एका सोनाराच्या दुकानात कोट्यावधीची चोरी नेपाळी वॉचमन गँगने केल्याचे उघड झाले. तर कॅम्प नं-४ येथील एका फायनन्स कंपनीच्या कार्यालयात रात्री लाईव्ह दरोडा करतांना पोलिसांनी दरोडेखोरांना शस्त्रासह अटक केली होती. त्यांच्याकडे गावठी कट्टा, तलवारी, चौपर, दोरी, गॅस कटर मशीन चोरट्याकडून जप्त केली होती. त्यावेळीही नेपाळी वॉचमन गॅंग असल्याचे उघड झाले होते.
शहरातील फायनन्स कंपन्या, उधोगपतीची घरे, गृहनिर्माण सोसायटी, सोनाराचे दुकानदार आदी मध्ये नेपाळी वॉचमन गॅंगची दहशत निर्माण झाली आहे. अश्या सोसायट्या, सोनार दुकाने व इमारती आदी संस्था नेपाळी वॉचमन ठेवण्यास धजावत नसल्याचे उघड झाले. बहुतांश गृहनिर्माण सोसायटया, इमारती, फायनन्स कार्यालये आदीमध्ये वॉचमन म्हणून ठेवलेल्या नेपाळी वॉचमनचे कोणतेही ओळखपत्र, पुरावा सोसायटीकडे नसल्याचे उघड झाले. गेल्या काही वर्षांपूर्वी वॉचमनला कामावर ठेवण्यापूर्वी त्याचे ओळखपत्र सोसायटी, फायनन्स कार्यालय, इमारती आदींनी मागविले नाही. तसेच याबाबतची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात देणे
बंधनकारक केली होती. मात्र कालांतराने यावर पडदा पडला असून नेपाळी वॉचमन गँगचे जबरी चोरी करण्याचे सत्र सुरूच असल्याची माहिती पोलिसांनी दिले