ठाणे पुन्हा तापले, उकाड्याने माणसासोबत पशू पक्षीही हैराण
By प्रज्ञा म्हात्रे | Published: April 28, 2024 08:36 PM2024-04-28T20:36:48+5:302024-04-28T20:37:03+5:30
पाणी आणि थंडावाच्या शोधात प्राणी पक्षी फिरत होते.
ठाणे : मुंबई आणि ठाण्यासह कोकणात कालपासून उष्णतेच्या लाटेचा अंदाज पुन्हा वर्तवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमधील काही भागांमध्ये तापमान वाढले असून शनिवारपासून ठाणेकरांना देखील कडक उन्हाच्या झळांना सामोरे जावे लागत आहे. शनिवारी कमाल तापमान ४१.३ तर रविवारी कमाल तापमान ४२.६ अंश सेल्सिअस होते. त्यामुळे अंगाची लाही लाही झाली होती. डोळ्यांना त्रास होत होता. पशू पक्ष्यांनाही या उन्हाच्या झळा असह्य झाला होता. पाणी आणि थंडावाच्या शोधात प्राणी पक्षी फिरत होते.
तापमान २२ एप्रिल ते २८ एप्रिल २०२४ (अंश से.)
२२ एप्रिल : कमाल - ३६.७ वेळ : दुपारी १.४५, किमान : २५.९ : वेळ : सकाळी ७.१५
२३ एप्रिल : कमाल - ३७.२ वेळ : दुपारी १.४५, किमान : २४.९ : वेळ : सकाळी ६.३०
२४ एप्रिल : कमाल - ३९.२ वेळ : दुपारी १.३०, किमान : २७.१ : वेळ : सकाळी ५
२५ एप्रिल : कमाल - ३९.३ वेळ : दुपारी १.३०, किमान : २५.३ : वेळ : सकाळी ७.३०
२६ एप्रिल : कमाल - ३८.६ वेळ : दुपारी १.३०, किमान : २७.७ : वेळ : सकाळी ६.३०
२७ एप्रिल : कमाल - ४१.३ वेळ : दुपारी १.१५, किमान : २८.४ : वेळ : पहाटे ३
२८ एप्रिल : कमाल - ४२.६ वेळ : दुपारी १.४५, किमान : २९.८ : वेळ : सकाळी ७.१५