ठाणे: आपल्या मनाविरूध्द काम करीत असल्यास त्या सभासदास त्रास देऊन पदावरून हटविण्याच्या सोसायटी पदाधिका-यांच्या मनमानी कारभाराला चाप बसविणारा महत्वपूर्ण आदेश ठाण्याच्या सहकार न्यायालयाने नुकताच दिला आहे. बिल्डरच्या अनियमितेला विरोध करणा-या मानपाडा येथील ‘राजविलास हवेली कोठी’ गृहनिर्माण संस्थेच्या खजिनदार वंदना कोळी यांना बेकायदेशीररित्या पदावरुन हटविले. पण, सहकार न्यायालयाने पुन्हा त्याच पदाचा कारभार कोळी यांच्याकडे सोपविण्याचा आदेश दिला.घोडबंदर रोडवरील मानपाडा येथील ‘राजविलास हवेली कोठी’ गृहनिर्माण संस्था, सोहम गार्डन येथे २७ बंगले आणि सहा रो हाऊस तसेच १२४ फ्लॅटसची सोसायटी आहे. या सोसायटीच्या मोकळया जागेवर ९९४.५० चौरस मीटर जागा मनोरंजनपार्कसाठी राखीव ठेवलेली आहे. बिल्डरकडून फ्लॅट घेताना ही जागा मनोरंजन पार्क, गार्डन म्हणून राखीव दाखविलेली होती. सोसायटीकडून संपूर्ण जागेचे डिम्ड कन्वेयन्स पूर्ण झालेले नव्हते. कायद्यानुसार सोसायटी नोंदणीकृत झाल्यावर सोसायटीच्या परिसरातील जागा सोसायटीच्या मालकीची असते. त्यावर विकासक हक्क सांगू शकत नाही. असे असतानाही विकासक चेतन पारेख यांनी या जागेची विक्र ी अल्मोरी व्यंकटेश्वर गुप्ता यांना केली. त्यानंतर त्यांनी त्या जागेवर बंगल्याचे काम सुरूही केले.सदर सोसायटीच्या खजिनदार वंदना कोळी २००९ पासून काम पाहत आहेत. जागरूक सभासद म्हणून खजिनदार पदाचे काम पाहत असलेल्या कोळी यानी ठाणे महापालिका, पोलीस खाते तसेच सोसायटीचे अध्यक्ष मनोज गडकर, सचिव प्रवीण कोठारी याना या लेखी तक्र ार दिली. व जागा विकण्यास तसेच आल्मोरी गुप्ता यांना सभासदत्व देण्यास आक्षेप घेतला. त्यामुळे अध्यक्ष आणि सचिव यांनी संगनमताने आणि आकसबुध्दीने १० आॅक्टोंबर २०१८ रोजी निबंधकाना लेखी कळवून खजिनदार पदाचा त्यांचा कार्यभार काढून घेतला, असे कोळी यांनी त्यांचे म्हणणे न्यायालयात मांडले. कोळी याना पदावरून हटवल्यावर कमिटीने गुप्ता याना बांधकाम पुढे सुरू ठेवण्यास अनुमती दिली.सोसायटीच्या निर्णयाविरूध्द वंदना कोळी यानी सहकार न्यायालयात धाव घेतली. सहकार न्यायालयात कोळी यांच्या वतीने वकील एस. एस. बुटाला यानी बाजू मांडली. कोळी याना हटविताना सोसायटीच्या पदाधिकाºयांनी महाराष्ट्र हौसिंग सोसायटी कायदयातील ५७-ए नुसार कायदेशीरबाबींची पूर्तता केली नसल्याचे वकील एस. एस. बुटाला यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.सहकार न्यायालयाच्या न्यायाधीश एम.एस. साळी यानी आदेश देताना कोळी यांना खजिनदार पदावरून हटवण्याच्या समितीच्या निर्णयाला स्थगिती दिली आणि त्याना खजिनदार पदाचा कारभार पुन्हा सोपवण्याचे आदेश दिले. कन्वेयन्सची प्रक्रिया न केल्याने मालक सोसायटीला दिलेली जमीन पदाधिका-यांना हाताशी धरून दुसरीकडे विकून पैसा कमावतात, याचे हे उदाहरण असून सहकार न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने पदाधिकायांच्या मनमानीला आळा बसू शकेल असा विश्वास बुटाला यानी व्यक्त केला.......................
बेकायदेशीररित्या हटविलेल्या पदाधिकाऱ्याकडे पुन्हा कारभार सोपवण्याचा ठाणे सहकार न्यायालयाचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 6:51 PM
सोसायटी पदाधिका-यांच्या मनमानी कारभाराला चाप बसविणारा महत्वपूर्ण आदेश ठाण्याच्या सहकार न्यायालयाने नुकताच दिला आहे. सोसायटीच्या पदाधिका-यांना हाताशी धरुन बिल्डर केलेल्या अनियमितेला मानपाडा येथील ‘राजविलास हवेली कोठी’ गृहनिर्माण संस्थेच्या खजिनदार वंदना कोळी यांनी विरोध केला होता. याच कारणामुळे त्यांना पदावरुन हटविण्यात आले होते. पण, सहकार न्यायालयाने पुन्हा त्याच पदाचा कारभार कोळी यांच्याकडे सोपविण्याचा आदेश दिला.
ठळक मुद्देठाणे सहकार न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णयसोसायटी पदाधिका-यांच्या मनमानी कारभाराला चापवंदना कोळी यांच्याकडे पुन्हा आला खजिनदार पदाचा पदभार