ठाणे जिल्ह्यात सरासरी 66.8 मिमी पाऊस; कसारा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक मंदावली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 01:36 PM2020-08-05T13:36:14+5:302020-08-05T13:36:26+5:30

कल्याण - नगर महामार्गावरील माळशेज घाटातील वळनावर बाईकची ट्रकला धडक बसल्याने या दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

Thane district receives an average rainfall of 66.8 mm | ठाणे जिल्ह्यात सरासरी 66.8 मिमी पाऊस; कसारा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक मंदावली 

ठाणे जिल्ह्यात सरासरी 66.8 मिमी पाऊस; कसारा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक मंदावली 

Next

ठाणे : रात्रभर पडणाऱ्या पावसाने ठाणे जिल्ह्याला झोडपले आहे. सतत सुरू असलेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 66.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने बुधवारी घेतली आहे. या दरम्यान ठाणे शहरात 16 झाडे उन्मळून पडली आहेत .तर कसारा घाटात दरडी व झाडे पडून वाहतुकीस आडथळा निर्माण झाला आहे. मुरबाडच्या टोकावडेपासून दोन किलोमीटर अंतरावरील हेदवली गावच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत या गावाचा संपर्क तुटला आहे.  

 कल्याण - नगर महामार्गावरील माळशेज घाटातील वळनावर बाईकची ट्रकला धडक बसल्याने या दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना कळवा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. कसारा घाटात ठिकठिकाणी दरडी कोसळल्यानेरस्त्यावर मातीचे ढिगारे व पडलेल्या झाडांतून वाट काढत वाहने पुढे जात आहेत. यामुळे या महामार्गावर वाहतुकीचा वेग मंदावला आहे.   


 ठाणे शहरात तब्बल 16 पेक्षा अधिक झाडे उन्मळून पडली आहेत. घोडबंदर रोडवरील पाटोनपाडा येथील सोसायटीतील आठ बाईकवर एक झाड पडले आहे. तर कळवा येथील मनिषा नगरसह शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या  आहेत. ठाणे शहर व तालुक्यात सर्वाधिक 93 मिमी पाऊस पडला आहे. या खालोखाल भिवंडीला 90 मिमी,  कल्याणला 35, मुरबाडला 70 ,शहापूरला 34, उल्हासनगर 44 आणि अंबरनाथ ला 70 मिमी पाऊस पडला आहे. ठाणे, मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या भातसा धरणात अवघा 88 मिमी आणि बारवी धरणात 93 मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Thane district receives an average rainfall of 66.8 mm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस